
'मी २८८ जणांचं सभागृह चालवू शकतो तर मी मुख्यमंत्री पण होऊ शकतो.', असं वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळ यांनी केले आहे. कल्याणमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून ते चर्चेत आले आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले की, 'आदिवासी विकास मंत्री व्हावं मात्र माझं म्हणणं होतं की, मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी मंत्री होऊ का? मी कोणतंही मंत्रिपद सांभाळू शकतो.', असं देखील त्यांनी सांगितले.
नरहरी झिरवाळ मंत्रिपदाबाबत सांगताना म्हणाले की, 'महायुतीच्या नेत्यांनी मला अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्रिपद दिलं. या खात्यात खूप आव्हान आहेत. कारण मनुष्यबळ कमी आहेत. साधनं नाहीत. राज्यात टेस्टिंग लॅब तीनच आहेत त्यांची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून मी विनोदाने म्हटलं की मी २९९ चं सभागृह चालवले. तर मी राज्य चालवू शकतो. सगळी खाती जनतेसाठी निर्माण केलेली आहेत. हे खातं पण मला मुख्यमंत्री पदासारखंच वाटत आहे.'
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे याबाबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सावध पवित्रा घेतला. चर्चा आहे, चर्चा असतात. अजूनही शरद पवार यांना कुणाला ओळखता आलं नाही. दोघे एकत्र आले तर चांगलंच होईल अशी चर्चा समाजात आहे. आदिवासी बहुल कोणत्याही एका जिल्ह्याचा पालकमंत्री करा, असे मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले. '१३ जिल्ह्यामध्ये बहुल आदिवासी भाग आहे. शिक्षण आणि आरोग्यासाठी काम करायला मला आवडत म्हणून मला चंद्रपूर द्या, पालघर द्या, आदिवासी बहुल कोणत्याही एका जिल्ह्याचा पालकमंत्री करा अशी मागणी मी नेहमीच करत असल्याचे झिरवळ यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना मंत्री नरहरी शिरवाळ यांनी सांगितले की, 'राजीनामा मागणं किंवा थेट एखाद्यावर आरोप करणे हे बरोबर नाही आपली सरकारी यंत्रणा खूप चांगली आहे. जो खरा दोषी असेल त्याचा तपास केला जाईल. त्याला कठोर शिक्षा केली जाईल. मात्र कुणीतरी सांगावं आणि कोणी दोषी ठरवावे हे बरोबर नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.