Maharashtra Politics : छगन भुजबळ यांना मिळाले 'देवेंद्रबळ'; अजितदादांनी डावलले, भुजबळांचे सूर बदलले, VIDEO

chhagan bhujbal and devendra fadnavis : राष्ट्रवादीत असताना देवेंद्र फडणवीस, भाजपचे विचार आणि संघ यावर सडकून टीका करणाऱ्या छगन भुजबळांचे आता सूर बदलले आहेत... मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने भुजबळांनी आता फडणवीसांची जवळीक वाढवलीय.. याच जवळीकीवरचा हा स्पेशल रिपोर्ट....
छगन भुजबळ यांना मिळाले 'देवेंद्रबळ'; अजितदादांनी डावलले, भुजबळांचे सूर बदलले, VIDEO
chhagan bhujbal and devendra fadnavisSaam tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

महायुतीचं सरकार स्थापन झालं...मंत्र्यांनी शपथ घेतली...मात्र यात अजितदादांनी छगन भुजबळांना डावललं आणि भुजबळांचे सूरच बदलले....एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या भुजबळांचे सूर चांगलेच बदलले आहेत.

छगन भुजबळ यांना मिळाले 'देवेंद्रबळ'; अजितदादांनी डावलले, भुजबळांचे सूर बदलले, VIDEO
CM Devendra Fadnavis : वाल्मिक कराड सरेंडर प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठी प्रतिक्रिया, म्हणाले .. | VIDEO

मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे नाराज भुजबळांनी जाहीर मेळाव्यातून अजितदादांवर टीका केली तर त्याचवेळी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. एवढंच नव्हे तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला भुजबळांनी थेट फडणवीसांच्या गाडीतून प्रवास केला...त्यामुळे त्यांच्या जवळिकीच्या चर्चेला आणखीनच बळ मिळालं.... हे कमी होतं की काय याच कार्यक्रमाच्या मंचावर भुजबळ आणि फडणवीसांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं.

छगन भुजबळ यांना मिळाले 'देवेंद्रबळ'; अजितदादांनी डावलले, भुजबळांचे सूर बदलले, VIDEO
Sanjay Raut On Devendra Fadnavis: सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक का केलं? संजय राऊत यांनी सांगितलं कारण

कशी वाढली फडणवीस-भुजबळांची जवळीक?

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंनी फडणवीस आणि भुजबळांना टार्गेट केलं होतं. फडणवीसांनी जरांगेंविरोधात कामयच मौन बाळगलेलं असताना भुजबळांनी मात्र जरांगेंवर तोडीस तोड उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर ओबीसी आंदोलनाला बळ देण्यासाठी भुजबळ मैदानात उतरले होते. त्यांनी ओबीसीच्या मुददयावर सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेटही घेतली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळ आणि भाजपात छुपी युतीच असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यामुळेच की काय महायुतीची सत्ता आल्यानंतर फडणवीस भुजबळांच्या मंत्रिपदासाठी आग्रही होते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

छगन भुजबळ यांना मिळाले 'देवेंद्रबळ'; अजितदादांनी डावलले, भुजबळांचे सूर बदलले, VIDEO
CM Devendra Fadnavis : सावित्रीबाईंच्या मूळगावी उभारणार स्मारक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा | Video

फुलेंचा विचार आणि कार्य पुढे नेण्याचं श्रेय भुजबळ हे नेहमीच शरद पवारांना देत आले. मात्र नायगावच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच भुजबळांनी जाहीरपणे सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा वारसा फडणवीस चालवत असल्याचं सांगत कौतुक केलं. तर क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या स्मारकाच्या कामाला गती भुजबळांमुळे मिळाल्याचं सांगत फडणवीसांनी भुजबळांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात रंगलेला फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचा हा केवळ कौतुक सोहळा होता की ही भुजबळांच्या पक्षांतराची नांदी याबाबत आता राजकीय विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com