शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का; ठाण्यातील बाप-लेकानं सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील शिंदे गटात. त्यांच्यासह पुत्र आणि मनसेचे माजी नगरसेवक राजन-ज्योती मराठेही दाखल.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv news
Published On
Summary
  • ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील शिंदे गटात.

  • त्यांच्यासह पुत्र आणि मनसेचे माजी नगरसेवक राजन-ज्योती मराठेही दाखल.

  • पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • एकनाथ शिंदे : "शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे, विकास हा आमचा अजेंडा."

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि टीडीसी बँकेचे माजी संचालक बाबाजी पाटील यांनी पुत्रासह धनुष्यबाण हाती घेतलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

महापालिका निवडणुका जवळ येताच राजकीय घडामोडीही वेगाने घडताना दिसत आहे. आज मनसेच्या राजन मराठे, ज्योती मराठे या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी त्यांच्या पुत्रासह शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलंय.

Maharashtra Politics
..तर PM-CMची खूर्ची जाणार; १३० व्या घटनादुरूस्ती विधेयकेवर अमित शहा काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात बाबाजी पाटील उभे होते. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात त्यांनी निवडणुक लढवली होती. मात्र, आज त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Maharashtra Politics
सिंहगडावरून खाली कोसळला, CCTVच्या मदतीनं गायकवाडला शोधलं, ५ दिवस नेमका कुठे होता? पोलिसांना वेगळाच संशय

हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांनी प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे स्वागत केलं आहे.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'युती सरकारच्यावतीनं राज्यात विकासकामे केली जात आहे. आम्ही विकासकामांमध्ये कधीही राजकारण केलं नाही. कधी करणारही नाही. महत्वाकांक्षी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. नागरिकांचा विश्वासआहे. लोकांना राजकारण नाही तर, विकासकामे हवीत. त्यामुळे शिंदे गटात मोठ्या संख्येनं इनकमिंग सुरू आहे' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Maharashtra Politics
तारीख पे तारीख ! Mumbai-Goa highway बनणार कधी? राज्य सरकारकडून नवी डेडलाईन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com