Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेना मंत्र्यांवर नाराज? बैठकीत खडेबोल सुनावले, राज्याच्या राजकारणात खळबळ!

Maharashtra politics latest updates : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. गुप्त बैठकीत अकार्यक्षम मंत्र्यांना खडेबोल सुनावत आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.
Eknath Shinde angry over ministers skipping Janata Darbar
Published On

वैदेही काणेकर, मुंबई प्रतिनिधी

Eknath Shinde angry over ministers skipping Janata Darbar : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराज असल्याचे समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे अॅक्शनमोडवर आले आहेत. त्यांनी मंत्र्यांवरील नाराजी एका बैठकीत उघड केली. आगामी निवडणुकीत नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यामुळे शिंदेंनी त्यांची कान उघडणी केल्याचे बोलले जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. काही दिवसांपू्र्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेटनंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी अकार्यक्षम मंत्र्यांना सचूना दिल्या होत्या.

गुप्त बैठकीत मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदेनी नाराजी नोंदवली होती. मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष यावरून शिंदेंनी मंत्र्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सत्तेत आल्यानंतर शिंदेंनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदेंनी मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. वेळापत्रकाचीही आखणी झाली होती. मात्र नव्याचे नऊ दिवस प्रमाणे काही मंत्र्यांनी सुरूवातीला जनता दरबार घेतले, मात्र कालांतराने मंत्र्यांनी या जनता दरबाराकडे पाठ फिरवली. यावरून शिंदेंनी जनतेने विश्वासाने संधी दिली आहे. नागरिकांमध्ये जावा, दिलेल्या जिल्ह्यांची जबाबदारी पार पाडत त्या त्या जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवायला हवे अशा सूचना दिल्या आहेत.

Eknath Shinde angry over ministers skipping Janata Darbar
Maharashtra Rain Alert : मेघगर्जनेसह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढील ४ दिवस राज्यात कोसळधार, पाहा कोणत्या जिल्ह्यांना दिला अलर्ट

मात्र अनेक मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत कॅबिनेट बैठकांसाठी त्यानंतर आपला मतदारसंघ इतकचं काय रुटीन करत असल्याची नाराजी बोलून दाखवल्याचे कळते. पक्षवाढीबाबत अनेक मंत्री फारसे कार्यरतही नसून अनेक नागरिक कार्यकर्ते हे आजही मंत्र्यांकडून कामं होत नाही, म्हणून आपल्याकडे येत असल्याचे बोलून दाखवले. पक्ष आहे म्हणून आपण आहोत, जनतेचे प्रश्न सोडवले जाणार नसतील तर त्या संदर्भात विचार करावा लागेल असा गार्भित इशाराच शिंदेंनी अकार्यक्षम मंत्र्यांना दिल्याचे कळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांवर शिंदेंनी विशेष जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

Eknath Shinde angry over ministers skipping Janata Darbar
पुण्यात मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन् पाच जिवंत काडतुसे, पुणे विमानतळावर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com