Maharashtra Politics : पलावा उड्डाणपूलाच्या विकास कामावरुन मनसे अन् शिवसेना शिंदे गटात जुंपली

मानकोली मोठा गाव पुलाचे काम 84 टक्के पूर्ण
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख

Maharashtra Politics News : कल्याण डोंबिवलीकरांना लवकरात ठाणे मुंबई गाठता यावी यासाठी एम एमएमआरडीएमार्फत उल्हास साडीवर माणकोली ते मोठागाव दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानंतर या पुलाच्या बांधकामाला वेग आला. आजच्या घडीला या प्रकल्पाचा एकूण काम ८४ टक्के झाला असल्याचा दावा आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल सर्वसामान्यांना रेल्वे शिवाय वाहतूकचे अतिरिक्त पर्याय देखील उपलब्ध होतील शिवसेना युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य दीपेश मात्रे यांनी आज या पुलाची पाहणी केली .

Maharashtra Politics
Vadodara Crime News : 3 मुलांच्या आईचे दोन तरुणांसोबत अफेअर, शेवटी दोन्ही प्रियकरांनी मिळून केलं भयंकर कृत्य

युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी आज मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मोठागाव मानकोली पुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे मार्च अखेर पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होईल.

खासदारांनी मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी १८ कोटी, मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिस:या टप्प्याकरीता ५७० कोटीची निविदा एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे. खासदारांमुळे विकास कामे मार्गी लागत आहेत.

मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाचे काम ८४ टक्के झाले असून या पूलाच्या कामाचा एक्सपान्शन जॉईन करणे हा शेवटचा टप्पा आहे. या कामाची पाहणी खासदार डॉ. शिंदे हे करणार आहे. हा पूल वाहतूकीसाठी एप्रिल महिन्यात खुला होईल असे म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान विकास कामांवरुन मनसे आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटात चांगली जुंपली आहे. शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी एकमेकांवर टीका केली आहे . मनसे आमदार राजू पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हात्रे यांनी त्यांनी डोंबिवली (Dombivli) पश्चिमेत मोठी डेव्हलमेंट होत आहे.

Maharashtra Politics
Yavatmal Fire News : शेतक-याच्या स्वप्नांची झाली राख रांगाेळी; कुटुंबाला बसला माेठा धक्का

आम्ही जी विकास कामे करतो ती टेक्नीकली साऊंड असतात. पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होते. त्याठिकाणी डेव्हलमेंट झाली. त्यानंतर पुलाचे काम सुरु झाले. पलावा जंक्शनचे काम रखडण्यात काही झारीतील शुक्राचार्य आहे. त्यामुळे कामे होत नसल्याची टिका नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली .

तर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील म्हात्रे यांना प्रत्युत्तर दिले आहे. माझी सातत्याने मागणी हीच आहे की, कल्याण शीळ रोड किंवा मानकोली ब्रीज असू देत त्याला पर्याय उपलब्ध करून त्या प्रकल्पाचा विचार केला पाहिजे. निवडणूक आली की लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर काम पुढे सरकावयाचे या अनुषंगाने केलेली ती मागणी आहे यात टीका करण्यासारखं काहीच नाही. मी वस्तुस्थिती मांडली आहे. ज्यांना झोंबली त्यांना झोंबु दे असा देखील टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com