Gujarat Crime News : गुजरातमधील वडोदरा येथून एका खळबळजनक घटना समोर आली आहे. यात दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसी विवाहित होती आणि तिला तीन मुलं देखील आहेत. ती पतीपासून वेगळी राहत होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी वडोदरा शहर गुन्हे शाखा आणि छणी पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकत्रित काम करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ही महिला कोण आहे, याचा शोध घेणे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी मृत महिलेचे छायाचित्र परिसरात दाखवले. यादरम्यान पोलिसांना ही महिला रानौली बसस्थानकाजवळ राहात असल्याची माहिती मिळाली. पोलीस (Police) तेथे पोहोचले असता तिथे घर रिकामे होते.
घटनास्थळावरून पोलिसांना महिलेच्या ओळखपत्रासह अनेक माहिती मिळाली आणि तिचे नाव चमेली असल्याचं समोर आले. त्यांच्यासोबत तिथे अजय यादव नावाचा मुलगाही राहत होता. जो चार दिवसांपासून बेपत्ता होता. दोघेही डिसेंबरपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. अजय हा यूपीचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावातून त्याला लग्नाचा प्रस्ताव आला आणि तो चमेलीला सोडून गावी गेला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
काही दिवसांनी चमेली तिचा प्रियकर अजय यादवचा मित्र उदय शुक्ला याच्या संपर्कात आली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. उदयचे लग्न झाले होते आणि चमेलीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यामुळे उदयही खूप अस्वस्थ झाला आणि त्याने चमेलीची सुटका करण्याचा विचार सुरू केला.
उदयने सर्व हकीकत त्याचा मित्र अजयला सांगितली, त्यानंतर दोघांनी चमेलीला मार्गातून दूर करण्याचा प्लॅन तयार केला. त्यासाठी त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा दिवस निवडला. उदय शुक्ला याने चमेलीला दुचाकीवर बसवून पद्मला गावातील मिनी नदीवर नेले. जिथे अजय आधीच त्याची वाट पाहत होता. दोघांनी मिळून चमेलीचा गळा आवळून मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.