Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी

Maharashtra Local Body Election: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ शिक्षण आणि पदवीधर निवडणूकीसाठीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी
Deputy CM Eknath Shinde Saam tv
Published On

Summary -

  • शिंदेसेनेकडून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू

  • एकनाथ शिंदेंनी जिल्हा पातळीवरील नेत्यांना स्वबळावर तयारीचे आदेश दिले

  • नुकताच शिवसेना नेत्यांची ऑनलाइन बैठक पार पडली

  • या बैठकीत जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेची निवडणुकीआधी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकताच शिवसेना नेत्यांची ऑनलाईन महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ही बैठक झाली. यामध्ये स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली. निवडणुसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वांना देण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिक्षण आणि पदवीधर निवडणूकीसाठीही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व/ पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख, मंत्री, आमदारांची महत्वाची बैठक नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी
Mahayuti Politics: अजित पवारांचा भाजपला 'दे धक्का'! डाव पलटवणारा नेता फोडला, शहा यांचा पक्षाला रामराम

या बैठकित औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्येही रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीत या निवडणुका लढवतील अशी आशाही धुसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. या सूचना करताना निवडणुका या युतीत अन्यथा स्वतंत्र लढण्यासाठी तयारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी
Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com