Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध

Kalyan-Dombivli Municipal Corporation: महापालिका निवडणुसाठी मतदान होण्यापूर्वीच भाजपला मोठं यश मिळत आहे. कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेमध्ये ७ आणि पनवेल महानगर पालिकेमध्ये ५ उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.
Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध
CM Devendra Fadnavis Saam Tv
Published On

Summary -

  • मतदानाआधीच भाजपचा मोठा राजकीय धडाका

  • डोंबिवलीत भाजपचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी

  • पनवेल महानगरपालिकेत भाजपचे ५ उमेदवार विजयी

  • विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे भाजपला यश

राज्यात महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान भाजपचा धडाका सुरूच आहे. मतदानाआधीच भाजपचे एकापाठोपाठ एक उमेदवार बिनविरोध निवडून येताना दिसत आहेत. कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा सातवा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. तर पनवेल महानगर पालिकेमध्ये आतापर्यंत भाजपचे ५ उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिका निवडणुकीतील भाजपचे ५ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. चार उमेदवारांच्या समोरील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे पनवेल महानगर पालिकेमध्ये भाजपचे नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा आणि दर्शना भोईर हे निवडणुकीपूर्वीच नगरसेवक झालेत. तर काही मिनिटांपूर्वी पाली शिंदे यांनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवार कांडपिळे बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत.

Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध
BMC Election: मुंबईत शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

तर दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये भाजपचा सातवा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. मनसेचे मनोज घरत यांनी माघार घेतल्याने कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा सातवा उमेदवार बिनविरोध निवडून आला. डोंबिवली प्रभाग क्रमांक '२७ ड'मधील महेश पाटील बिनविरोध निवडून आलेत. आज छाननी आणि अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी आतापर्यंत भाजपचे ७ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील ४ उमेदवार असे एकूण ११ उमेदवार बिनविरोध विजय झालेले आहे.

Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध
BMC Election : मुंबईत राज ठाकरेंना ऐनवेळी धक्का; मनसेच्या ११ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com