Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! विश्वासू नेता सोडणार साथ

Vikas Pasalkar join To Ajit Pawar Group : शरद पवार यांना राजकीय धक्का बसला आहे कारण त्यांचे विश्वासू सहकारी विकास पासलकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात सामील होणार आहेत. संभाजी ब्रिगेडच्या नेत्याचे हे पाऊल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर उघडवणारे आहे.
Vikas Pasalkar join To Ajit Pawar Group
Vikas Pasalkar with Ajit Pawar — a major political shift in Maharashtra as Sharad Pawar loses a loyal aide.Saam Tv
Published On
Summary
  • शरद पवारांचे विश्वासू सहकारी विकास पासलकर आता अजित पवारांच्या गटात जाणार आहेत.

  • पासलकर यांनी संभाजी ब्रिगेडमधून समाजकार्यात मोठं योगदान दिलंय.

  • अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

शरद पवारांचे विश्वासु सहकारी असलेले संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असणारे पासलकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत.

विकास पासलकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत. ते गेल्या अनेक वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून समाज कार्य करत होते. गेल्या अनेक वर्ष काम करत असताना कार्यकर्ते लोकांच्या भावना समजून आता राजकारणात प्रवेश करणार असल्याचं पासलकर या पक्ष प्रवेशाबाबत म्हणालेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकरांना मानणारी संघटना आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करत असताना आनंद होईल. गेल्या अनेक वर्ष मी शरद पवार यांच्यासोबत आहे त्यांना विचारूनच हा निर्णय घेतलाय. त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही, मात्र आता पुढे जात असताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, त्यामुळे हा निर्णय घेत आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये विकास पासलकर कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com