Maharashtra Politics: संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली, पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; अध्यक्षांचे राजीनामे सत्र सुरू

Sandeep Naik Join Sharad Pawar Group: संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली. पण संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेशाला शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.
Maharashtra Politics: संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली, पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; अध्यक्षांचे राजीनामे सत्र सुरू
Sandeep Naik Join Sharad Pawar GroupSaam Tv
Published On

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली. पण संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेशाला शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. नाराजीनाट्यानंतर आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ११ तालुका अध्यक्षांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. संदीप नाईक तुतारी हातात घेत असल्याने त्यांनी हे राजीनामे देण्यात आले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामे दिले आहेत. तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत.

आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये होणाऱ्या निर्धार मेळाव्यात संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेतली. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. संदीप नाईक यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी निर्धार मेळाव्यामध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. संदीप नाईक यांनी २५ पेक्षा अधिक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.

Maharashtra Politics: संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली, पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; अध्यक्षांचे राजीनामे सत्र सुरू
Maharashtra Politics: मविआच्या नाराजीनाट्यावर पडदा! काँग्रेसचा 'हा' नेता वाद मिटवणार, शरद पवार- ठाकरेंशी चर्चा करणार

विष्णुदास भावे सभागृहाच्या प्रवेशद्वारावर तुतारी आणि राष्ट्रवादीचे झेंडे फडकवण्यात येत आहेत. संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संदीप नाईक यांनी आधी अजित पवार गटाकडे तिकिटासाठी मागणी केली. पण तिकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संदीप नाईक यांनी आता शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळतेय की नाही हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली, पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; अध्यक्षांचे राजीनामे सत्र सुरू
Maharashtra Politics: नगरचं राजकारण तापलं! काल जयश्री थोरातांनी झापले, आज सुजय विखेंनी पुन्हा डिवचले!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com