Maharashtra Politics : नाकाने कांदे सोलू नका, आत्मपरीक्षण करा; प्रवीण दरेकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून शिंदे गटावर टीका केली होती.
Pravin Darekar, Aditya Thackeray
Pravin Darekar, Aditya ThackeraySaam TV

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं, ज्यांनी खरी शिवसेना वाढवली. आता ते गद्दार कसे झाले? असा सवाल दरेकरांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. (Maharashtra Political News)

Pravin Darekar, Aditya Thackeray
Aditya Thackeray : बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

ज्यांनी ४०-४० वर्ष शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, त्यांना तुम्ही एका दिवसांत गद्दार म्हणता आहात, अजून तरी आत्मपरीक्षण करा. जरा सुधरा, टीका टिपणीतून बाहेर या, असा सल्लाही प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांना दिला आहे. ते कल्याणमध्ये बोलत होते.

उद्या म्हणजेच मंगळवारी विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. मात्र, या तैलचित्रावरून शिंदे आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. औरंगाबादेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर (Eknath Shinde) शाब्दिक हल्ला चढवला होता. माझे आजोबा सुद्धा विचार करत असतील काय हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचं अनावरण करतात, अशी जोरदार टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती.

त्यांच्या या टीकेचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं, ज्यांनी खरी शिवसेना वाढवली. आता ते गद्दार कसे झाले? असा सवाल दरेकरांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

Pravin Darekar, Aditya Thackeray
Maharashtra Politics : ठाकरे गटाचा भाजपला सर्वात मोठा धक्का; बडा नेता लावला गळाला!

मला वाटतं अजूनही सुधारायचं लक्षण दिसत नाही गद्दार-गद्दार खोके-बोके याच्या पलीकडे शिंदे साहेब कोसो दूर गेलेत. तुम्ही टीका करत रहा. तुम्ही टोमणे मारत राहा. आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचं पडलं आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. (Latest Marathi News)

तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्राचा वाटोळं केलं. 25 वर्षात मुंबईची वाट लावली. आता आम्हाला विकास करायचा आहे. तुमच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही. अडीच वर्षे दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ना ? मग का नाही त्यांनी आपल्या वडिलांचं तेल चित्र लावलं असा सवाल दरेकर यांनी केला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com