Konkan Teachers Constituency : भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया; बाळाराम पाटलांबद्दलही बोलले...

MLC Elections Result : कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी बाळाराम पाटील यांचा पराभव केला.
Dnyaneshwar Mhatre Vs Balaram Patil
Dnyaneshwar Mhatre Vs Balaram Patil SAAM TV
Published On

सिद्धेश म्हात्रे

Dnyaneshwar Mhatre Vs Balaram Patil : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, पहिलाच कौल भाजपच्या बाजूने लागला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बाळाराम पाटील यांच्याबद्दलही खास प्रतिक्रिया दिली आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teachers Constituency) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (BJP vs MVA) अशी सरळ लढत होती. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मोठ्या मतांच्या फरकानं विजयाचा विश्वास आधीच व्यक्त केला होता. निवडणुकीचा निकाल आज लागला आणि म्हात्रेंच्या अपेक्षेनुसार विजयी देखील झाले. या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dnyaneshwar Mhatre Vs Balaram Patil
Graduate Election Result: विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

हा विजय सर्व शिक्षकांचा (Teachers) आहे. मला सर्व संघटना आणि पक्षाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानं विजय झाला. शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या सहा वर्षांत जी काही कामे केली होती, त्याची पोचपावती आज मिळाली आहे. ३३ संघटनांचा पाठिंबा होता.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकला होता, तो सार्थ ठरलेला आहे. रविंद्र चव्हाण, उदय सामंत, केसरकर यांनी मेहनत घेतली होती. त्या आधारावरच विजय मिळाला आहे. हा विजय शिक्षक आणि ३३ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आहे, असे म्हात्रे म्हणाले.

Dnyaneshwar Mhatre Vs Balaram Patil
Election Result Live Updates : कोकणची जागा आम्ही जिंकलो, बऱ्याच काळानंतर आम्ही विजय मिळवला - देवेंद्र फडणवीस

या कारणांमुळे विजय

अनुदानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, ते सोडवण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलने केली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. अत्यंत महत्वाचा विषय होता. तो मार्गी लागला आहे. आता पेन्शनचा मुद्दा सोडवायचा आहे, असा निर्धारही म्हात्रेंनी यावेळी व्यक्त केला.

हा शिक्षकांनी घेतलेला बदला आहे. सहा वर्षांत शिक्षकांची कामे झाली नव्हती, असा शिक्षकांचा आरोप होता. मी हजारो शिक्षकांची, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा माझ्या विजयाला कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी म्हात्रेंनी बाळाराम पाटील यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. बाळाराम पाटील यांनी पराभव मान्य केला असेल तर मी निश्चितपणे त्यांचे आभार मानतो. याशिवाय त्यांच्या शुभेच्छाही मी स्वीकारतो. मी शिक्षकांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही यावेळी देतो, असेही म्हात्रे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com