उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर पडदा पडणार की मध्यांतर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२० जून २०२२ रोजी शिवसेनेत बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी थेट गुवाहाटी गाठून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. इतकंच नाही, तर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता देखील स्थापन केली होती.
शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस धाडताच शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
त्यानंतर कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले होते. तसेच लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आदेशच दिले होते. परंतु, या सुनावणीत दिरंगाई करण्यात आल्याचा दावा करत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) पुन्हा कोर्टात धाव घेतली.
त्यानंतर, ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे आदेश कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. ३१ जानेवारीची डेडलाईन हुकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोर्टाकडे १० जानेवारीपर्यंत मुदत वाढून देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार, आज म्हणजे बुधवारी या प्रकरणाचा निकाल येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतात? याकडे शिंदे-ठाकरे गटासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.