राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे- संजय राऊत
राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे- संजय राऊतSaam Tv

राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे- संजय राऊत

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये (Governer And CM) साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape Case) प्रकरणी आज पत्र व्यवहार झाला.
Published on

मुंबई: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये (Governer And CM) साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape Case) प्रकरणी आज पत्र व्यवहार झाला. राज्यापालांनी साकीनाका घटने प्रकरणी खंत व्यक्त केली आहे, आणि घटनेच्या चर्चेसाठी दोेन दिवसांचं अधिवेशन घेण्याची विनंती केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाची गरज नसल्याचे सांगितले आणि केंद्र सरकारने चार दिवसीय अधिवेशन घेवून त्यात साकीनाका घटनेवर चर्चा करण्याची विनंती केली.

त्यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ''राज्यपाल गंमत करतात, गुजरात मध्ये रोज तीन बलात्कार होता आहेत, मग गुजरात मध्ये एक महिन्याचे अधिवेशन बोलवावे लागेल. संसदेचे ४ दिवसांचे अधिवेशन बोलावावे त्यात साकीनाक्याच्या घटनेटी चर्चा करु. मुख्यमंत्र्यांची भूमिका परखड आहे, हा राष्ट्रव्यापी विषय आहे''.

राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे- संजय राऊत
Special Report: महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत? पाहा Video

प्रतिक्रिया देताना संजय राऊत पुढे म्हणाले ''मीडियाकडे पत्र लीक करण्याची राज्यपालांना गरज नाही. विरोधकांनी राज्यांची बदनामी करू नये. राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. राज्यात काय चाललंय याबाबत पंतप्रधान, गृहमंत्री यांना भेटून आम्हाला विषय मांडावा लागेल. झाकली मूठ सव्वालाखाची, आता मूठ उघडली आहे, आणखी काय उघडायला लावू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com