Sunil Tatkare On Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यामध्ये ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना अद्याप खातेवाटपही झालं नाही.
यातच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठकही पार पडल्या. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी गेला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबई विमानतळावरून आता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. याचदरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी याशी संबंधित एक मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणाले तटकरे?
पत्रकारांशी संवाद साधत खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, ''उद्या संध्याकाळपर्यंत खाते वाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा प्रश्न निकालात निघाल्याचे आपल्याला कळेल. आमच्यात व्यवस्थित चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार दिल्लीला गेले नव्हते. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीला जात आहेत.'' रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरु असलेल्या वादावर ते म्हणाले की, ''यावरून कुटलाही वाद नाही. आम्ही रायगड पालकमंत्री पदासाठी कधीही आग्रही नव्हतो.''
काही तासानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल : मंत्री उदय सामंत
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ''मी आजही सांगतो, काही तासानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण ते किती तासात होणार, ते सांगू शकत नाही. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर करण्यात येईल.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.