Madhuri Misal Profile : नगरसेविका, आमदार ते मंत्री... माधुरी मिसाळ यांचा धगधगता राजकीय प्रवास!

Maharashtra Cabinet Expansion : पर्वती मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पुण्यातून त्यांना तिकीट देण्यास विरोध कऱण्यात आला होता. नगरसेविका, आमदार आणि आता मंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम पाहणार आहेत.
madhuri Misal
madhuri Misalmadhuri Misal
Published On

Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुण्यातील माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद देण्यात आलेय. पुण्यातील पार्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा आमदार झाल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विधानसभेच्या तिकीटाला भाजपमधून विरोध करण्यात आला होता. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरत विजय मिळवला. माधुरी मिसाळ यांना कष्टायचे फळ मिळाले. त्यांना मंत्रि‍पदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आलाय. त्या आज नागपूरमध्ये मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

२० वर्षांपासून माधुरी मिसाळ यांनी पुण्यात भाजप वाढवण्यासाठी काम केले. नगरसेविका ते आमदार आणि आता मंत्री म्हणून माधुरी मिसाळ काम करणार आहेत. उच्चशिक्षित असणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पुणेकरांना खूप अपेक्षा आहेत. पुण्याच्या सामाजिक-राजकीय आणि पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्यासाठी माधुरी मिसाळ यांचं मोलाचं योगदान आहे. कसबा मतदारसंघातून २००७ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना पर्वती मतदारसंघात आमदारकीचं तिकीट मिळाले. तेव्हापासून त्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम करत आहेत. २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे त्यांनी पर्वती मतदारसंघातून यश मिळवलेय.

madhuri Misal
Chandrakant Patil Profile : मिल कामगाराचा मुलगा, अभविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री, वाचा चंद्रकांत पाटलांची राजकीय कारकीर्द

राजकीय कारकीर्द-

विधानसभा सदस्य (आमदार), पर्वती मतदारसंघ, पुणे

कार्यकाळ: 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग. सलग चौथ्या टर्मसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला.

पुणे महापालिकेत 22 भाजप नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येण्यास मदत झाली.

कोण कोणती कामं केली?

स्वारगेट येथील मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब

(ESIC) 500 खाटांचे रुग्णालय

स्थानिक कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी

कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो,

खडकवासला ते खराडी मेट्रो

सिंहगड रोड उड्डाणपूल

गंगाधाम फ्लायओव्हर

स्वारगेट उड्डाणपूल

तळजाई वन नियोजन

पर्वती टेकडी संवर्धन आणि वारसा नियोजन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ सुरू करणे.

इतर राजकीय भूमिका-

-सचिव, महाराष्ट्र प्रदेश भाजप

-सदस्य, लोकलेखा समिती, महाराष्ट्र

-पुणे शहर भाजप अध्यक्ष

-माजी सदस्य, पुणे महानगरपालिका

-विधानसभा प्रतोद

आतापर्यंत भूषवलेली पदे

संचालिका, तीर्थ रिअल इस्टेट (शहरी विकास, बांधकाम आणि पायाभूत सुविधा)

अध्यक्षा, सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (शिक्षण)

संचालिका, उद्यम को-ऑप बँक लिमिटेड (बँकिंग)

अध्यक्षा, सतीश मिसाळ फाउंडेशन (चॅरिटी) (सामाजिक कार्य)

माजी अध्यक्षा,विद्या को-ऑप बँक लि. (बँकिंग)

माजी विश्वस्त, शिक्षण प्रसारक मंडळी (शिक्षण)

1989 पासून संचालक आणि अध्यक्ष म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.

22 वर्षांपासून पायाभूत सुविधा विकास आणि बांधकाम क्षेत्रात काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com