Maharashtra Politics : ...तेव्हा घाबरलो नाही, तर व्हीपला कोण घाबरणार? भास्कर जाधव स्पष्टच बोलले

व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
Bhaskar Jadhav News
Bhaskar Jadhav News Saam TV

रुपाली भडवे

Bhaskar Jadhav on Whip : आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात सुरु होत आहे. काल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला आहे. परंतु माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्ही घाबरलो नाही तर व्हीपला कोण घाबरणार असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. पण, सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, काल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार पलटवार केला.

Bhaskar Jadhav News
Sanjay Raut : आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणाची चौकशी एका दिवसात का थांबली? संजय राऊत यांचा रोख कुणाकडे?

काय म्हणाले भास्कर जाधव?

व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचं संरक्षण काढलं तरी आम्ही घाबरलो नाही तर व्हिपला कोण घाबरणार असे अनेक व्हिप आम्ही बघितले, ते आले आणि गेले, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी दिली आहे.

"उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि त्यानंतर घडलेल्या घटनांना आम्ही कधी घाबरलो नाही. त्यामुळे व्हीप दिला यावरून आम्हाला धमकी देवू नका. शिंदे गटाच्या मंडळींना पंक्षांतर बंदीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. हे सत्तापिपासू लोक आहेत. येणारी निवडणूक सत्तेचा वापर करून जिंकायची, एवढच यांना माहित आहे. ही विकृती आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देण- घेण नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Bhaskar Jadhav News
Kasba Bypoll Election: हेमंत रासनेंसह भाजपच्या 'या' नेत्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

शेड्यूल १० या पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याचं सरकारला भान आहे का? अटलबिहारी वाजपेयी यांनी हा कायदा आणला होता. बंडखोरांनी एखाद्या पक्षात सामील व्हावं किंवा नवीन पक्ष स्थापन करावा. व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com