Fake Ration Cards: भिवंडीत बांगलादेशातील नागरिकांना बनावट रेशनकार्ड बनवण्याचा धंदा; ATSनं तिघांना ठोकल्या बेड्या

ATS Action On Bangladeshi: महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना अटक केलीय.
Fake Ration Cards
Fake Ration Cardssaam Tv
Published On

Fake Ration Cards:

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना अटक केलीय. हे आरोपी बांगलादेशातील नागरिकांना रेशनकार्ड बनवत असल्याचा आरोप अटकेत असल्यांवर आहे. महाराष्ट्र एटीएसनं भिवंडी शहरातील निजामपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केलीय. (Latest Crime News)

इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास आणि कारवाई स्थानिक पोलीस करत आहेत.देशात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढू लागलीय. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात बांगला देशी नागरिकांचं वास्तव वाढलंय.

हे नागरिक बनावट कागदपत्रांच्या साहाय्यानं वास्तव्य करत आहेच शिवाय ते सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. अशाच अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांना बनावट शिधापत्रिका बनवून देत असल्याची माहिती एटीएस च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटने सापळा रचून ३ जणांना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्यांपैकी नौशाद रेशन दुकान चालवतो. तर इतर दोन लोकांवर बनावट कागदपत्रे बनवण्याचा आरोप आहे.

हे तिघेजण बांगलादेशी नागरिकांना रेशन कार्ड मिळवून देत होते. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशातील नागरिकांसाठी भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी लोकांकडून पैसे घेत. बनावट रेशनकार्ड बनवण्यासाठी ते ८ हजार रुपये घेत असतं. बनवून देत होते.

नेरुळ सापडले होते बांगलादेशी

एका मराठी वृत्तानुसार, नवी मुंबईतील नेरूळ येथे काही दिवसांपूर्वी बांगलादेशी नागरिक सापडले होते. दहशदवाद विरोधी पथकानं येथून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. अहदुल इंजील मुल्ला, रत्ना अहदुल इंजील मुल्ला, आणि रिपा बिश्वास अशी त्यांची नावे होती.

अहदुल इंजील मुल्ला आणि रत्ना हे बांगलादेशातील जांगरी लंगडा गावातील रहिवासी आहेत. तर रत्ना बांगलादेशातील मिर्जापूर येथील रहिवासी आहे. अहदुल इंजील मुल्ला, रत्ना अहदुल इंजील मुल्ला हे दोघे १२ वर्षांपूर्वी आई वडिलांच्या समवेत भारतात आले होते.

Fake Ration Cards
Satara Crime: प्रियकराशी लग्न करण्यासाठी नवऱ्याला संपवलं; हत्या केल्यानंतर कालव्यात फेकलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com