Mahadev Book App
महादेव ऑनलाईन बुक अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून सट्टा खेळण्यासाठी लोकांना प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप असून मुंबईत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
देश विदेशातील तब्बल ३१ कुप्रसिद्ध सट्टेबाजांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून लंडन तसेच दुबईवरून सट्टा चालवला जात आहे. सट्टेबाजीतून मिळालेला पैसा देश-विदेशातील मालमत्ता तसेच हॉटेल्स आणि इतर व्यावसायात गुंतवल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीवर कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महादेव ऑनलाईन बुक अॅप प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनाही यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर मुंबईनजीक पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बांधण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे. दुबईत फेब्रुवारी २०२३ मध्ये एका शाही लग्न सोहळ्यासाठी तब्बल २०० कोटी खर्च करण्यात आला होते. हे लग्न छत्तीसगडमधील भिलाईचा रहिवासी सौरभ चंद्राकरचे होते. या खर्चामुळे हे लग्न ईडीच्या रडारवर आले आणि ईडीच्या चौकशीत मनिलॉन्ड्रिंगचे मोठे जाळे उघड झाले.
सौरभ चंद्राकरने त्याचा मित्र रवी उप्पल सोबत महादेव ऑनलाईन अॅपची सुरूवात केली होती. दरम्यान दुबईतील त्या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे बॉलिवूड स्टार ईडीच्या रडारवर आले. त्यानंतर सुपरस्टार रणबीर कपूरलाही समन्स बजावण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.