Palghar News : विजेचा दाब वाढला, मालकरीपाड्यातील टीव्ही, फ्रीजसह विद्युत उपकरणं जळाली

या घटनेमुळे ग्रामस्थांना माेठा मनस्ताप सहन करावा लागला.
palghar, malkari pada
palghar, malkari pada saam tv

Palghar News : पालघर विद्युत महावितरण विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका सफाले उंबरपाडा हद्दीतील मालकरीपाडा (malkari pada palghar) येथील वीज ग्राहकांना बसला आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास अचानक विद्युत वाहिनीवरील विजेचा दाब वाढल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. (Maharashtra News)

palghar, malkari pada
Ganeshotsav 2023 : ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा... राज्यभरात गणरायाचे आगमन, बच्चे कंपनीला माेदकांचे आकर्षण

राज्यभरात गणेशाेत्सवाची धामधूम सुरु आहे. पालघर जिल्ह्यात देखील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आज पहाटेपासून नागरिकांची धांदल सुरु हाेती. सफाले उंबरपाडा हद्दीतील मालकरीपाडा येथे पहाटेच्या सुमारास अचानक विद्युत वाहिनीवरील विजेचा दाब वाढला.

palghar, malkari pada
Eco-Friendly Ganpati साकारुन 'वीर मराठा' ने सामाजिक बांधिलकी जाेपासात समाजापुढे ठेवला आदर्श

यामुळे घरांमधील वीज मीटर जळून खाक झाले आहेत. दुसऱ्या बाजूला घरात असलेल्या फ्रीज, टीव्हीसह इतर विद्युत उपकरणे देखील जळाली. गेल्या अनेक महिन्यांपासून या विद्युत वाहिनीचा मेंटेनन्स न केल्याने हा विद्युत दाब अचानक वाढल्याचा येथील ग्रामस्थांकडून (villagers) सांगण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com