Election | राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
रश्मी पुराणिक, मुंबई
मुंबई : राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून ठरलेल्या वेळेतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) तसं आदेश काढत हे जाहीर केलं आहे. त्यामुळे आता ठरलेल्या वेळेतच निवडणुका (Elections) होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींमधील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच (OBC Reservation) होणार आहेत. 21 डिसेंबर 2021 ला त्यासाठीचे मतदान पार पडणार आहे. तर 19 जानेवारी 2022 ला मतमोजणी होणार आहेत. तर 18 जानेवारी 2022 ला ओबीसी आरक्षित जागेतील निवडणुका पार पडतील. - Local Governance Body Elections will be held without OBC reservation
राज्य सारकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवला होता. तो प्रस्ताव निवडणूक आयोगाने (Election Commission) फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 21 डिसेंबरला ओबीसी आरक्षित जागा वगळता नियोजित जागांवर मतदान होणार आहे. तर ओबीसी आरक्षित जागांवर खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे. दोन्ही मतदानांची एकत्रित मतमोजणी 19 जानेवारीला होणार आहे.
चार महानगरपालिकांमधील 4 रिक्तपदांच्या आणि 4,554 ग्रामपंचायतींतील 7,130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबर 2021 ला मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरु आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.