भाजप सरकारकडून राज्याची कोंडी केली जातेय, ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न होतात - भुजबळ

भाजप सरकारकडून राज्याची कोंडी केली जातेय, ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळू नये म्हणून याचे लोक प्रयत्न करतात, असा थेट आरोप राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलाय.
ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न होतात - भुजबळ
ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न होतात - भुजबळSaam Tv
Published On

नागपूर : भाजप सरकारकडून राज्याची कोंडी केली जातेय, ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळू नये म्हणून याचे लोक प्रयत्न करतात, असा थेट आरोप राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलाय. भाजप सरकारमुळे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील ओबीसी संकटात आले आहेत, असंही ते म्हणाले. - Chhagan Bhujbal Criticize BJP Government Over OBC Reservation Verdict By Supreme Court

ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून हे भाजपचे लोक न्यायालयात जातात - भुजबळ

भारत सरकारने सांगितलं की हा डाटा ९९ टक्के बरोबर आहे पार्लामेंट कमिटीला त्यांनी सांगितलं की हा डेटा बरोबर आहे. आम्हाला सांगतात की हा डेटा सदोष आहे. हा डेटा आम्हाला द्यावा. हे सर्व ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत सरकारने पहिल्या एफिडेविटला आणखी एक एफिडेविट जोडलं आणि सांगितलं की हा डेटा ओबीसीचा नाहीच. आतापर्यंत ते कधीही हे म्हणाले नव्हते की हा डेटा ओबीसीचा नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या, त्यांना तो डेटा द्यायचा नव्हता. तेव्हा त्यांनी भूमिका घेतली की आम्ही ओबीसीची जनगणना किंवा डेटा गोळा केलेलाच नाही. मग गोपीनाथ मुंडेंनी कसली मागणी केली होती. देवेंद्र फडणवीसांनी, पंकजा मुंडेंनी कुठली मागणी केली होती. ओबीसीचा डेटा द्या हीच मागणी केली होती.

ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न होतात - भुजबळ
ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणे हा अन्याय - पंकजा मुंडे

भाजप सरकार आपल्याला डेटा देणार नाही. त्यामुळे आपली केस तिथेच थांबते. आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे आम्ही दुसरी केस टाकली की निवडणूक पुढे ढकला. तिथेही भाजपचे सेक्रेटरी राहुल वाघ न्यायालयात गेले. ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून हे भाजपचे लोक न्यायालयात जातात. त्यांनी विरोध केला. अखेर न्यायालयाने सांगितलं की ओबीसीशिवाय निवडणुका घ्या. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न होतात - भुजबळ
ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम; इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

कोंडी करण्याचा प्रयत्न - भुजबळ

भाजप सरकार खोटं बोलत आहेत. ओबीसीचाच डेटा गोळा केलेला होता. जो उज्वला गॅस योजनेपासून सगळीकडे वापरला जातो. फक्त तो निवडणुकीला आम्ही सांगितलं आम्हाला द्या, तेव्हा ते द्यायला तयार नाही. कोंडी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एकीकडे मंत्र्यांविरोधात खोट्या केसेस करायच्या, सीबीआय़, इनकम ट्रक्सच्या रेड टाकायच्या आणि दुसरीकडून ओबीसीची कोंडी करायची आणि जनतेपुढे एक असं दृष्य निर्माण करायचं की महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे हे ओबीसी विरोधात आहेत. यासाठीच त्यांची सर्व ढोंगबाजी सुरुये. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

आता आम्ही डेटा गोळा करण्यास सुरुवात केलीये. दोन वर्षात एक माणुस बाहेर येत नव्हता, कोरोनामुळे सर्वे घरात होते. 2021 ची जनगणना भारत सरकारने सुरु करायला हवी होती. ती देखील ते सुरु करु शकले नाही, याचं कारण म्हणजे कोरोना आणि आम्हाला तुम्ही सांगता की तुम्ही दोन वर्षे बसले का? दोन वर्षांत कोरोनामुळे काय काम झालंय.

भाजप सरकारमुळे फक्त महाराष्ट्रातील ओबीसी नाही तर देशातील ओबीसी संकटात आलाय. हे भाजपने लक्षात ठेवावं.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com