
बदलापूर: फायनान्स कंपनीकडून कर्ज (Loan) घेणं एका रिक्षाचालकाला महागात पडलं आहे. कर्जाचे हप्ते थकल्यानं रिकव्हरी एजंटने एका रिक्षा चालकाचं डोकं फोडल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये (Badlapur) घडली आहे. या घटनेनंतर नितीन मोरे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली असता पोलिसांनी संबंधित कंपनीच्या रिकव्हरी एजंटविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करताच हा रिकव्हरी एजंट पळून गेला आहे. (Loan Recovery Agent Attack On Auto Driver Because Of Pending EMI; Crime Report In Badlapur Police Station)
हे देखील पाहा -
बदलापूरच्या गांधीनगर परिसरात नितीन मोरे हे रिक्षाचालक राहतात. नितीन मोरे यांनी मनबा फायनान्स कंपनीकडून ४० हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हप्ते ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे या कंपनीतून त्यांना सतत फोन केले जात होते. मात्र नितीन यांनी फोन न उचलल्याने शनिवारी ४ जून रोजी कंपनीचा रिकव्हरी एजंट थेट नितीन यांच्या घरी आला आणि त्याने नितीन यांना कर्जाचे हप्ते का भरत नाही? याचा जाब विचारत शिवीगाळ केली. यावेळी नितीन आणि या एजंटमध्ये झटापटी झाली. यात या एजंटने जमिनीवर पडलेली वीट उचलून नितीन यांच्या डोक्यात मारल्यानं नितीन यांचे डोकं फुटलं. या घटनेनंतर हा एजंट तिथून पळून गेला. या घटनेनंतर नितीन मोरे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली असता पोलिसांनी संबंधित कंपनीच्या रिकव्हरी एजंटविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मात्र हा रिकव्हरी एजंट फरार झाला आहे.
दरम्यान, नितीन मोरे यांनी याच कंपनीकडून यापूर्वी सुद्धा दोन वेळा कर्ज घेतलं होतं. या दोन्ही वेळा त्यांनी नियमितपणे कर्ज फेडलं होतं. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे त्यांना कर्जाचे हप्ते भरणं शक्य झालं नाही. त्यामुळे कंपनीने रिकव्हरी एजंट पाठवून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिकव्हरी एजंटने नितीन यांना केलेली शिवीगाळ आणि मारहाण चुकीची असून या घटनेनंतर फायनान्स कंपन्यांनी त्यांच्या रिकव्हरी एजंट्सना चाप लावण्याची मागणी केली जात आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.