मुंबई : राज्यातील लोडशेंडींग (Loadshedding) आणि महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती याबाबतची महत्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उद्या बोलवली असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितिन राऊत आणि वीज कंपन्यांचे डायरेक्टर उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सध्या वीजेचा (Electricity) तुटवडा असल्याने सध्या राज्यातील अनेक भागात लोडशेडिंग सुरु केल्याने सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसला आहे. राज्यात 8 तास लोडशेडींग करण्याचा निर्णय उर्जा विभागाकडून घेण्यात आल्यावर विरोधकांनी सरकावर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंजाब सरकारने (Punjab Goverment) त्यांच्या राज्यात ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत केली आहे. मग राज्य सरकार वीज दर का वाढवत आहेत असाही प्रश्न विचारले जात आहेत.
तसंच खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस असून दररोज 20 ते 22 हजार मेगावॉट वीजेची राज्याला गरज असताना आता 28 हजार मेगावॉटची मागणी आहे. दोन दिवसात हीच मागणी 30 हजार मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. लवकरच या निर्णयासाठी मंत्रीमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे मागे वर्तवली असती अशातच आता उद्या राज्य सरकारची बैठक होणार असून या बैठकीत लोडशेडींग वरती काय तोडगा काढतात हे पाहणं गरजेच आहे.
Edited By - Jagdish patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.