
Maharashtra Liquor Sale Update : नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता सरकारने चिअर्स केलं आहे. नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे
अनेकजण मद्य पिऊन नव वर्षाचे स्वागत करत असतात. या काळात सर्वाधिक मद्यविक्री होते. २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बीअर/ वाइन विकणाऱ्या दुकानांना सकाळी 1 वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. FLBR-II परवानाधारकांसाठीही अशीच मुदतवाढ देण्यात आली.
नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. याच मद्यप्रेमींना सरकारकडून चिअर्स करण्यात आलेय. ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी करण्यात आलेत.
गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
२१ डिसेंबर रोजी गृह विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलेय. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील. तर परमीट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. रात्री साडेदहा वाजता राज्यभरात दारूची दुकाने बंद होतात. पण ख्रिसमस आणि वर्षाअखेरीस मद्यविक्रीची वेळ वाढवण्यात आली आहे.
सर्वांसाठी सेलिब्रेशन पण पोलिसांची होणार दमछाक
24, 25 डिसेंबर आणि थर्टी फस्ट हे तीन दिवस सर्वजण सेलिब्रेशन करतात. पण या काळात बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवल्याने पोलिसांची कसरत होणार आहे.
३१ डिसेंबर २०२४ रोजी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहे. तसेच अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके तैणात होतील. रात्रीच्या गस्त, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी पोलिसांकडून होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.