Pune News: आईची साक्षच ठरली महत्वाची, पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

Pune Latest News: राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय
life imprisonment
life imprisonmentSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, पुणे

Pune News: नात्याला काळीमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातल्या (Pune) राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे घडली होती. एका बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच बलात्कार केला होता. यामध्ये पीडित मुलगी गरोदर राहिली होती. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत अखेर बापाला शिक्षा मिळाली आहे. या 45 वर्षीय नराधम बापाला अखेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावली आहे. राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय

life imprisonment
Suresh Raina On MS Dhoni: धोनी 'या' दिवशी खेळणार आपला शेवटचा सामना; सुरेश रैनाने केला खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये ही घटना घडली होती. आरोपी आपल्या 16 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. आई घरातून कामाला गेल्यानंतर तो तिच्यावर बलात्कार करत होता. याबाबत आईला काही सांगितल्यास मुलीसह आईला मारून टाकण्याची धमकी तो द्यायचा. आपल्या मुलीवर पाच महिने या नराधम बापाने बलात्कार केला होता. त्याच्या या कृत्यामुळे मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर बापाचा घृणास्पद प्रकार समोर आला.

life imprisonment
Sanjay Raut News: मोदी-शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील...; कर्नाटक निवडणुकांवरुन संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

या घटनेनंतर संतप्त झालेल्या आईने पीडित मुलीसह पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत 3 मे 2019 रोजी अटक केली होती. आरोपीला येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. मात्र त्या बाळाचा मृत्यू झाला. त्याचा डीएनए, पीडित मुलीचा डीएनए आणि नराधम बापाचा डीएनए तपासण्यात आला. मयत अर्भकाचा बाप आणि पीडित मुलीचा बाप एकच असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला होता.

life imprisonment
DRDO Espionage Case: प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये अडकला, ATS ने व्यक्त केला संशय

हे प्रकरण राजगुरूनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी 11 साक्षीदार तपासले. नात्याला काळिमा फासणारा हा गुन्हा असून साक्ष, पुरावे भक्कम आहेत. आरोपीला दया दाखविण्यासारखी ही घटना नसून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला. यात पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. अखेरी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com