पुण्याच्या आळेफाटा मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय. यावेळी कुत्रा जीव वाचविण्यासाठी बंगल्याच्या दरवाजा जवळ मोठमोठ्याने भुंकत होता. त्याच्या बचावासाठी मालकाने धाव घेतली तत्पूर्वी बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय.
पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात बिबट्याने मध्यरात्री कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याने मोठ्याने भुंकायला सुरूवात केली, त्यामुळे बिबट्याने पळ काढला. कुत्रा भुंकत असताना घराचे मालक दरवाजा उघडून बाहेर (Leopard Attack On Dog) आले, त्यामुळे मात्र बिबट्याने माघार घेतली. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये टिपला गेलाय. आजवर अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार पुण्यात बिबट्याने केलीय.
परंतु व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्रा बिबट्यावर भारी पडलेला (Pune News) आहे. घराच्या मालकाने कुत्रा अडचणीत आहे, याची चाहूल लागताच लाईट लावून आल्यामुळे कुत्र्याचा जीव वाचलेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्रा घराच्या ओट्यावर बसलेला आहे. एवढ्यात एक बिबट्या अतिशय हलक्या पावलाने येत (Leopard Attack Video) आहे. बिबट्या कु्त्र्यावर हल्ला करणार, इतक्यात कुत्र्याचा आवाज ऐकून घरमालक दरवाजा उघडतो अन् बिबट्या धूम ठोकतोय.
नारायणगाव जवळील वारुळवाडी येथे घरासमोर दोन कुत्रे गस्तीवर होते. तेव्हा शिकारीसाठी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने एका कुत्र्यावर झडप टाकुन घेऊन गेला. यावेळी बिबट्याचा हल्ला दुसऱ्या कुत्र्याने (Leopard Attack On Dog) पाहिला. मात्र, बिबट्याला विरोध करण्याची क्षमता नसल्याने कुत्र्यालाही बघ्याचीच भुमिका घ्यावी लागली होती. एकीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. पुणे जिल्ह्यात बिबट्यासह आता कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.