आमदारांना मानगुटीला धरून नेलं जातंय : आदित्य ठाकरे

शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam Tv

मुंबई: शिवसेनेतील (Shivsena) ४० आमदारांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मेळावे घेण्यास सुरूवात केली आहे. आज सांताक्रुज येथील सभेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. 'शिवसेनेच्या आमदारांच्या मानगुटीला धरुन नेल जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. (Eknath Shinde Latest News)

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे. या बंडामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, तर राज्यभरात शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निदर्शने सुरू केली आहेत.

Aditya Thackeray
Eknath Shinde Vs Shivsena Live: दुसऱ्या पक्षात जाण्यावरुन बंडखोर आमदारांमध्ये मतभेद

आदित्य ठाकरे म्हणाले, या सभेतील शिवसैनिकांचा हा उत्साह बघून भारावून गेलो आहे. आज गुवाहतीमध्ये सगळे ही सभा पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटायल बोलवले त्यांना विचारले होतं की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? तेव्हा शिंदे काही बोलले नाही, असंही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

काल गुवाहाटीमधील एक व्हिडिओ पाहिला, या व्हिडिओतून दिसते काय त्यांनी परिस्थिती करुन घेतली आहे. या बंडखोरांना आता राज्यात जागा नाही. जी लोक सत्तेसाठी गेली आहेत त्यांना आता परत सेनेत आणि महाराष्ट्रात जागा नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
एकनाथ शिंदेंसह दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई यांची मंत्रीपदं धोक्यात

आमचा शिवसैनिक खदीच पक्ष सोडत नाही. शिवसेनेत सर्वसामान्यांना न्याय मिळता, हे विधान परिषदेवरुन समजले असेल. आमशा पाडवींना आमदारकीचे तिकीट दिले. शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या मंत्र्यांना, आमदारांना कितीतरी फंड दिला आहे, तरीही ही लोक फंड दिला नाही म्हणून ओरडत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला पाडल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com