तुम्ही आवडीनं आणि चवीनं खाणाऱ्या कॅडबरीमध्ये अळ्या आहेत, असं म्हटलं तर उगीच किळसकरु नका. कारण पुण्यात एका कॅडबरीत जिवंत अळ्या सापडल्यायत. त्यामुळे जर तुमच्या पर्समध्ये किंवा फ्रिजमध्ये किंवा हातात कॅडबरी असले तर आताच तुमच्या कॅडबरीत अळ्या तर नाही ना हे तपासून पाहा.
पुण्यात राहणारे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी स्विगी इस्टांवरून कॅडबरी टेम्टेशन मागवली. ही कॅडबरी खात असतांना त्यांना चक्क कॅडबरीत अळ्या दिसल्या. यावेळी त्यांनी कॅडबरीचे फोटो काढून ही कॅडबरी फेकून दिली यानंतर त्यांनी कॅडबरी कंपनीवर आरोप करत म्हटलं आहे की, ''कॅडबरी टेम्प्टेशन आणि मणुका प्रिमियम कॅडबरीत अळ्या आढळल्या आहेत. मी अळ्या असलेल्या कॅडबरीचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवले. कंपनीकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.
अळ्यामिश्रित कॅडबरीची तक्रार करण्यासाठी अक्षय जैन यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी कॅडबरी कंपनीकडून रॅपर, कॅडबरी आपल्याकडे आहे का? अशी उलट विचारणा झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
याबाबत बोलताना कंपनीने म्हटलं आहे की, आम्हाला खेद आहे, की आमच्या उत्पादनामध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असं काही घडल्यास आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले घटक पाठवा. तुमच्या समस्येचं निराकरण करू.
या सगळ्याप्रकारानंतर केवळ रस्त्यावरचे उघडे पदार्थचं धोकादायक नाहीत तर सीलबंद पदार्थही आरोग्यास अपायकारक ठरु शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय...पुण्यातील हे अळीयुक्त चॉकलेट एखाद्या चिमुरड्यानं खाल्लं असतं तर काय अनर्थ घडला असता? तुम्ही जर स्वत: किंवा तुमच्या मुलांना कॅडबरी चॉकलेट देत असाल तर आता एकदा नव्हे 100 वेळा विचार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.