congress on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना १५०० रुपये अन् भावोजींना पाठवा दारूच्या आहारी; काँग्रेसची सरकारवर घणाघाती टीका

Ladki Bahin Yojana Latest news : लाडक्या बहीण योजनेवरून काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य महसूल विभागाच्या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला भरभरून मत दिलं. लाडक्या बहिणींच्या साथीमुळे महायुती सत्तेवर आली आहे. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता देखील मिळणे सुरु झाले आहेत. याचदरम्यान, सरकारच्या एका निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. 'राज्य सरकार लाडक्या बहिणींना १५०० रुपये देत आहे. तर भावोजींना दारूच्या आहारी पाठवत आहेत, अशा शब्दात काँग्रेसने फडणवीस सरकारवर टीका केली.

congress on Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics News: नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?; सांगितला तो किस्सा

राज्य उत्पादन शुल्काच्या एका निर्णयाचा काँग्रेसने जोरदार विरोध केला. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य उत्पादन शुल्काच्या निर्णयावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सचिन सावंत म्हणाले, 'एका बाजूला राज्यातील महिलांना लाडकी बहीण संबोधून ₹१५०० देत स्वतःला भाऊ म्हणवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावोजींना दारुच्या आहारी पाठवत दारुडे करायचे. कित्येक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांचे पती मुले मारझोड करुन व्यसनासाठी पैसे हिसकावून घेतात'.

congress on Ladki Bahin Yojana
Pune Crime News: शरद मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायला आले आणि जेलमध्ये गेले; पुणे पोलिसांनी उधळला गँगवॉरचा कट

'दारुच्या व्यसनातून किती कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. याची मोजणी करता येणार नाही. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या उत्थानासाठी होती, असे म्हणणारे सरकार त्याच महिलांना करणार आहे, घरादारावर उठलेले हे सरकार भाऊ की वैरी हे आता भगिनींनी ओळखावे, असे ते पुढे म्हणाले.

congress on Ladki Bahin Yojana
Mumbai Crime: मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर

'राज्य सरकारने आता व्यसनमुक्ती नशा मुक्ती कार्यक्रम बासनात गुंडाळून ठेवावे आणि खुलेआम "घरे बुडवा -दारु जिरवा" कार्यक्रम हाती घेऊन दारुचा प्रचार प्रसार सुरू करावा. जाहीर निषेध! योजनांना लागणारा निधी जमा करण्यासाठी लोकांची घरे उद्ध्वस्त करण्याऐवजी भ्रष्टाचार कमी केला तर अधिक चांगले राहील, असे सावंत पुढे म्हणाले. काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या टीकेनंतर महायुतीमधील नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com