Kurla News: कुर्ल्याच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपीने न्यायाधिशांनाच चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार (१, एप्रिल) ला न्यायालयीन कामकाज सुरू असताना हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे या ३९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे तायडेवर २०१६ व २०११ मध्ये ना म जोशी मार्ग, ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न व मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. याच गुन्ह्यात तारखेसाठी तायडेला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयात त्याने आपल्यावरील प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लावून कोर्टाच्या फेर्यातून मुक्त करावे ही मागणी करत आरडाओरड करू लागला.
त्याचवेळी प्रदिप तायडेने अचानक न्यायाधिशांच्या दिशेने पायातली चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी प्रदिप तायडेवर कुर्ला पोलिस ठाण्यात ३५३,३२८, १८९, ५०६, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत. (Kurla Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.