कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण; घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल

अग्नीशमन दल आणि एनडीआरएफने शर्थीचे प्रयत्न करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.
Kurla Building Collapse
Kurla Building CollapseSaam Tv
Published On

मुंबई : कुर्ला (Kurla) एल विभागातील नेहरुनगर येथील ४ मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी दुर्घटना काल रात्री घडली होती. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला तर 13 जखमी झाले. जखमींवर सायन आणि राजावाडी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. अग्नीशमन दल आणि एनडीआरएफने शर्थीचे प्रयत्न करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीने (BMC) इमारत जीर्ण असल्याचे सांगून ती रिकामी करण्याची नोटीस दिली होती, तरीही या इमारतीतील फ्लॅट मालक आणि इतरांनी भाडेकरूंना राहण्यासाठी घर दिले. पोलिसांनी फ्लॅट मालक रजनी राठोड, किशोर नारायण चव्हाण, बाळकृष्ण राठोड, दिलीप विश्वास आणि इतर घरमालकांविरुद्ध कलम ३०४(२),३०८,३३८, ३३७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

हे देखील पाहा -

ठाकरे सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीतील इमारत कोसळून त्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली.

मृतांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून २ लाखांची मदत

दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी २ लाख रुपये दिले जातील. जखमींना ५०,००० रुपये देण्यात येईल', अशी घोषणा पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट हँडलद्वारे नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Kurla Building Collapse
एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात लावलेले 'ते' बॅनर चर्चेत

दरम्यान, या इमारत दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दुर्घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. शिवाय यावेळी त्यांनी या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरित जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com