कोरेगाव भिमात टाकीत पडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी टाकीत पडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
कोरेगाव भिमात टाकीत पडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
कोरेगाव भिमात टाकीत पडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू रोहिदास गाडगे

पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी टाकीत पडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. शुभम आचार्य असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोरेगाव भिमा येथील देवराम गव्हाणे यांच्या घरातील टाकी उपसण्याकरिता गेलेला तरुण टाकीत पाईप टाकताना तोल जावून पडला आहे. नंतर त्याला वाचवण्याकरिता गेलेले ही दोघे या टाकीत पडले आहेत.

हे देखील पहा-

याची माहिती कळताच जवळीलच शुभम आचार्य हा २४ वर्षीय तरुण त्यांना वाचवायला गेला आणि तो देखील यात तोल जाऊन पडला आहे. या घटनेची माहिती कळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चौघांना बाहेर काढले आहे. परंतु, उपचारापूर्वीच शुभम आचार्य यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ३ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वाघोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com