Konkan Express Delay: रेल्वेचा भोंगळ कारभार! कोकणात जाणाऱ्या ट्रेनचा १८ तासांपासून खोळंबा; प्रवाशांचे अन्न-पाण्यावाचून हाल

Konkan Express: शौचालयातील पाणी देखील संपले आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
Konkan Express Delay
Konkan Express DelaySaam TV
Published On

विनय म्हात्रे

Konkan Express Delay:

मध्य रेल्वेचा अतिशय भोंगळ आणि अपयशी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काल दुपारी 3 वाजता झालेल्या अपघातानंतर मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी काही एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आल्या. यावेळी उत्तरेकडून देखील काही एक्सप्रेस ट्रेन आल्या. सध्या १७ ते १८ ट्रेन गेल्या १३ तासांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. (Latest Marathi News)

Konkan Express Delay
Virar-Dahanu Local Train News : विरार-डहाणू लोकल सेवेच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यास रेल्वेचा नकार, जाणून घ्या कारण

प्रवाशांचे हाल

गेल्या १२ ते १३ तासांपासून प्रवासी ट्रेनमध्येच अडकून आहेत. सध्या नावडे रोड रेल्वे स्थानकात दादर-सावंतवाडी ही एक्सप्रेस ट्रेन उभी आहे. ट्रेनमध्ये पाणी नाही, खायला अन्न नाही, औषधांची सोय नाही. पंखेही बंद पडलेत. एसी कोचमधील एसी देखील बंद आहेत. शौचालयातील पाणी देखील संपले आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

ट्रेन केव्हा सुरू होणार याची माहिती प्रवाशांना देण्यात आलेली नाही. प्रसार माध्यमांना देखील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मध्य रेल्वे प्रशासन स्वच्छ्ता पंधरवडा कार्यक्रमात व्यस्त असल्याचं चित्र दिसत आहे. जनसंपर्क विभाग त्या कार्यक्रमाचे अपडेट्स देत आहेत मात्र ट्रेनच्या खोळंब्याचे एकही अपडेट देली जात नाहीये.

मुंबईहून सुटलेल्या ट्रेन ठाणे किंवा दिवा स्थानकावर थांबवता आल्या असत्या. या स्थानावरून प्रवासी घरी जाऊ शकत होते. मात्र मध्य रेल्वेने तसे केले नाही. सर्व ट्रेन एकाचवेळी पुढे आणल्या. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या ट्रेन देखील होत्या. कोकण रेल्वे याबाबत वारंवार माहिती विचारात आहे. मात्र मध्य रेल्वेकडून माहिती देण्यात येत नाहीये, अशी तक्रार आहे.

Konkan Express Delay
Salman Khan In Train: मुंबई लोकलमध्ये सलमान खान! जबरदस्त डान्स स्टेप्सने प्रवाशांचं लक्ष वेधलं; रील VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com