'शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह लोकांच्या मनात कोरलेलं; ते गोठवलं तर...'

'ज्या हिंदुत्वावर हे बोलत असतात त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह भाजपच्या मदतीने गोठवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत आहे.'
Shivsena Symbol Dispute
Shivsena Symbol DisputeSaam TV
Published On

मुंबई: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे लोकांच्या मनात कोरलेलं आहे, जर ते गोठवलं तर त्याच रागातून जनता लोकशाही पद्धतीने उत्तर देईल असं वक्तव्य शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वादामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यातच या दोन्ही गटांतील वाद आता सुप्रीम कोर्टापासून (Supreame Court) केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे.

खरी शिवसेना (Shivsena) आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मोठी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. या मागणीमुळे राज्यातील शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढण्याची आहे.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाललेला सर्व प्रकार लोक बघत आहेत. ज्या हिंदुत्वावर हे बोलत असतात त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह भाजपच्या मदतीने गोटवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत आहे.

बाळासाहेबांच्या मुलाला खुर्चीवरून खेचलं गेलं हे देखील लोक पहात आहेत. केद्रीय गृहमंत्री ज्या पद्धतीने शिवसेनेला आसमान दाखवायची भाषा करतात त्यावर कोणी चक्कार शब्द काढत नाही. यावरूनच गेलेले सर्व लोक शिवसेनेचे नसून ते भाजपचे झाले असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

Shivsena Symbol Dispute
...म्हणून सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली; उज्वल निकम काय म्हणाले? पाहा VIDEO

शिवाय कठीण पेपर कसे सोडवायचे हे शिवसेनेला चांगलं माहित आहे. यापूर्वीही रणसंग्राम होता आता फक्त तो जरा जास्त आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह लोकांच्या मनात कोरलेलं आहे. जर ते गोठवलं तर त्याच रागातून जनता लोकशाही पद्धतीने उत्तर देईल असंही पेडणेकर म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com