'इतिहास बदलत असाल, तर...', किशोरी पेडणेकर यांची फडणवीसांवर टीका

'आम्हीही तयार आहोत ठोक के जवाब घ्यायला.'
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam Tv
Published On

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा पार पडली. त्यात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली. त्याला भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या सभेला 'टोमणे बॉम्ब' संबोधले आहे आणि 'जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा' असे त्यांनी ट्वीट केले आहे. त्याला आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.

सभेचा आरसा गेलाय त्यामुळे १०० टक्के मार्क मिळणार नाही. आम्हीही तयार आहोत ठोक के जवाब घ्यायला. बाबरी पाडली तेव्हा आम्हाला समजत होतं, तेव्हा आगडोंब उसळलेला आम्हाला ठाऊक आहे. इतिहास बदलत असाल, तर तुम्हीही इतिहास व्हाल अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

काल किरीट सोमय्यांवरती उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला सोमय्यांनी उत्तर दिले होते. तुम्ही काय धमक्या देता? जे सत्य आहे ते समोर येईल, स्त्री पुरुष काही बघायचं नाही, तोंड बंद करा ही धमकी आहे, त्यावर पण मी विचार करेन. दरवेळी धमकी देता, जे चाळे चाललेत, धमक्या कोणाला देता. खोटं दाखवतात ते दाखवा, पण महिलेला धमक्या देताय असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरणावरही किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही, ती मनोरुग्ण आहे त्याचे ती धडे देते, तिला झटका येतो, त्या झटक्यात काही झाल असेल, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com