मुंबई - किरीट सोमय्या यांचा तिसऱ्यांदा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील पाहा -
काल माझ्या वर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केला होता. मी पोहचण्या पूर्वी तिथे 70 ते 80 शिवसेनिकांची व्यवस्था केली होती. मला शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याला पोलीस कमिशनर संजय पांडे जबाबदार आहेत. त्यांनी हा हल्ला घडवून आणाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे सरकारची काम करण्याची क्षमता संपली आहे असा गंभीर आरोप देखील यांनी केला आहे.
हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला. सकाळी केंद्राचे कॅबिनेट सचिव राजीवकुमार गौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना याविषयी चौकशी करायला सांगितले आहे. उद्या भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. गृह सचिव आणि इतरांची भेट घेणार आहेत असे देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मी पोलिस स्टेशनमध्ये जाताना माझ्या गाडीवर हल्ला झाला. दगड आणि काचाच्या बाटल्या फेकण्यात आल्या. काल मी स्पष्ट सांगितलं माझ्यावर हलला करण्यात येईल अधिकारी यांनी सांगितलं सगळ्या व्यवस्था केली आहे. मात्र तरी माझ्यावर हल्ला झाला. हा हल्ला पोलीस कमिशनर पांडे यांनी घडवून आणला असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. एफआयआरमध्ये लिहिले आहे की, शिवसेना कार्यकर्ते ३ किलोमीटर दूर आहेत. हे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी लिहून दिलं. माझ्या गाडीवर फक्त एकच दगड आला हे माझ्या नावाने संजय पांडेंनी लिहिलं. ज्या वेळी माझी सही घ्यायला ते आले, मी सांगितलं की मी या मॅनिप्युलेटेड एफआयआरवर सही करणार नाही. तर मला तिथले डीसीपी यांनी धमकी दिली. डीसीपी म्हणाले की, एफआयआर नोंद झाली आहे. तुम्ही सही केली नाही तरी हीच एफआयआर गृहीत धरली जाणार. या प्रकारची गुंडगिरी हे माफिया सरकार करतं आहे, असंही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.