''कारवाई होणार नाही हा भ्रम, हजारो कोटींचा घोटाळा, ईडी अधिकाऱ्यांचे आभार''

संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद दिली.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv
Published On

मुंबई: संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद दिली. आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन, प्रॉपर्टी आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना आधीच लक्षात आले होते त्यांनी म्हणून त्यांनी 55 लाख ईडी कार्यालयात परत केले होते असे किरीट म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार असल्याचे म्हटले आहेत. मागील दोन महिन्यापासून ते ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो. यांना वाटतं पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू पण कारवाई होणार त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी प्रॉपर्टी जप्त केली आहे असे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले आहेत.

Kirit Somaiya
Sanjay Raut Big Breaking : संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच

''गेल्या काही दिवसांपासून राऊतांची नौटंकी''

1 हजार 48 कोटींचा घोटाळा ही कारवाईची सुरुवात आहे. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम आहे. मी काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो असेही किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या म्हणाले मी काही दिवसांपुर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मला असे वाटत की संजय राऊत यांना चाहूल लागली होती, म्हणून गेले काही दिवस यांची नौटंकी सुरू होती त्यावर आज पडदा असल्याचंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री यांनी जाब विचारला पाहिजे होता. उद्धव ठाकरेंना असे वाटत की ते माफीया सेनेचे माफिया सरकार आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी माहिती घेतली पाहिजे असेही सोमय्या म्हणाले.

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मनी लाँड्रिंगमधील एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल तर, सगळी मालमत्ता भाजपला दान करू, असं राऊत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. 'असत्यमेव जयते' असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाया वेगाने सुरू आहेत. यावरून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईडी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ईडीवर गंभीर आरोपही केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ईडीविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाऊ शकतील, असेही राऊत म्हणाले होते. मात्र, आता संजय राऊत यांच्याविरोधातच ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com