किरीट सोमय्यांनी अंगावर कार घातली, शिवसैनिकांचा आरोप

मुंबईतील खार पोलीस ठाण्याजवळ किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली.
Kirit Somaiya car attacked
Kirit Somaiya car attacked SAAM TV
Published On

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर, किरीट सोमय्या यांनी अंगावर कार घातल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कारवरही काल, शुक्रवारी रात्री कलानगर परिसरात हल्ला झाला होता. तो हल्लाही शिवसैनिकांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Kirit Somaiya car attacked
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला; काच फुटली, सोमय्या जखमी, म्हणाले...

किरीट सोमय्या आज, शनिवारी रात्री अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या भेटीसाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्याचवेळी त्यांच्या कारवर दगडफेक झाली. ही दगडफेक शिवसैनिकांनी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. तर, दगडफेकीत सोमय्यांच्या कारची काच फुटली. काचेचा तुकडा सोमय्यांच्या हनुवटीवर लागला. यात ते जखमी झाले. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. पोलिसांच्या सहकार्याने खार पोलीस ठाण्याच्या आवारात १०० शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला. जीव घेण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये बसलो असताना माझ्या बाजूच्या खिडकीची काच फोडली. मला लागले. देवाच्या कृपेने मी वाचलो, असे सोमय्यांनी सांगितले. मी आता वांद्रे पोलीस ठाण्याच्या आवारात कारमध्ये बसलो आहे. वाशिमनंतर पुणे आणि आता खार येथे जीव घेण्याचा उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेचा प्रयत्न असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

दुसरीकडे या हल्ल्याच्या घटनेनंतर शिवसैनिकांकडूनही आरोप होत आहे. आम्ही किरीट सोमय्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी खार पोलीस ठाण्याच्या आवारात जमलो होतो. त्याचवेळी किरीट सोमय्या यांनी आमच्या अंगावर मुद्दामहून कार घातली, असा आरोप शिवसेना नेते महाडेश्वर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com