Pune Crime News: भंगार व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण; ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्यांचा पोलिसांकडून पर्दाफाश

Kidnapping Of Scrap Dealer Son: आरोपींनी १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करत ३० लाख रुपयाच्या खंडणी मागितली.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

गोपाळ मोटघरे

Pune News:

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन आरोपींनी एका भंगार व्यवसायिकाच्या मुलाचं अपहरण केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करत ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. (Latest Crime News)

Pune Crime News
Pune Crime News: बहिणीला त्रास देतो म्हणून दाजीची हत्या; नंतर मेव्हण्याने स्वत:ही संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने अपहरण करणाऱ्या तीनही आरोपींना अपहरण झाल्याच्या घटनेपासून फक्त चार तासाच्या आतच बेड्या ठोकल्या आहेत. तेजस, अर्जुन आणि विकास या तिघांनी मिळून आज सकाळी ताथवडे परिसरात राहणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाच्या चौदा वर्षाचे मुलाचे मारुती झेन कारमध्ये अपहरण केलं होतं.

अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या काकाला वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून तीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने तांत्रिक तपास करून अपहरण करणाऱ्या आरोपीचे लोकेशन ट्रेस केले.

त्यानंतर अवघ्या चार तासाच्या आत अपहरण करणाऱ्या तिन्ही आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिन्ही आरोपीकडून तीन मोबाईल फोन, एक पिस्टल, एक अडीच फूट लांबीचा कोयता, एक सुरा, छत्री, हातोडा आणि मास्क असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Pune Crime News
Hyderabad Restaurant Crime: बिर्याणीसोबत दही मागितल्याने हत्या; रेस्टॉरंटमधील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com