Kasba Peth By Election : कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा विजय; पण चर्चो होतेय अभिजीत बिचुकलेची, काय आहे कारण?

Abhijit Bichukale: सोशल मीडियावर बिग बॉस फेम, कसबा पेठ मतदारसंघातील पराभूत उमेदवार अभिजीत बिचुकलेला मिळालेल्या मतांची चर्चा होत आहे.
Abhijit Bichukale
Abhijit BichukaleSaam tv

Abhijit Bichukale News : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. तब्बल 28 वर्षांनी कसब्यात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा विजय झाला असलातरी मात्र सोशल मीडियावर बिग बॉस फेम, कसबा पेठ मतदारसंघातील पराभूत उमेदवार अभिजीत बिचुकलेला मिळालेल्या मतांची चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Abhijit Bichukale
Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंचा डंका; RPI आठवले गटाचे २ उमेदवार विजयी

कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा (BJP) बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आपण देऊ तो उमेदवार निवडून येईल, अशी शाश्वती भाजपला होती. कसबा पेठ मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसब्यात तळ ठोकावा लागला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री-अपरात्री मतदारांना भेटत होते. तरीही पोटनिवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. कसबा पेठ मतदारसंघात विजय महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा झाला असला, तरी सोशल मीडियावर पराभूत उमेदवार अभिजीत बिचुकलेला मिळालेल्या ४७ मतांची चर्चा होत आहे. त्याचबरोबर बाह्मण महासंघाचे आनंद दवे यांना २९६ मते मिळाली आहेत.

दरम्यान, कसबा पेठ मतदारसंघातील पराभवावर अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukale) प्रतिक्रिया दिली आहे. बिचुकले म्हणाला, 'आज पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात एक ना एक दिवस अढळ स्थान निर्माण करीन. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा सव्वा लाखांनी पराभव झाला होता. म्हणून त्यांनी समाजकारण सोडले नाही. मी तर स्वत:च्या मनगटाच्या बळावर समाजकारण करीत आहे'.

Abhijit Bichukale
Eknath Shinde :...तर एकदा नव्हे 50 वेळा तो गुन्हा करेन; 'देशद्रोही' विधानावरून CM शिंदे यांचा खुलासा

'फक्त चार खासदार असलेले शरद पवार हे देशाचे नेते म्हणवतात. आता मी हरलो असलो तरी उद्याचा शंभर टक्के नेता असल्याचे आत्मविश्वासने बिचुकलेने नमूद केला. दरम्यान, या निवडणुकीत पैसा, मद्य याचा वापर झाल्याचा दावा बिचुकलेंनी केला. ते म्हणाले लोकांना काय वाटतं त्यांनी ते केलं. लोकांना दारु, मटण, पैसा हेच हवं असेल तर ते माझ्याकडे येणार नाहीत. असेही बिचुकलेनं म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com