

सचिन जाधव
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या जागासाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिडणुकीसाठी मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांनी जोरदार ताकद लावली. आता या पोटनिवडणुकीत निकालाच्या आधीच रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात विजयाची बॅनरबाजी केली आहे. या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
कसबा विधानसभा मतदारसंघात निकाल आधीच दोन्हीकडून विजयाची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून पुण्यात बॅनरबाजी पाहायला मिळाली. पुण्यातील समाधान चौकात हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लागले. तर निकालपूर्वीच हेमंत रासने यांना आमदार म्हणत समर्थकांकडून रासने यांना शुभेच्छा देत बॅनर लावण्यात आले आहेत.
तर कसबा विधानसभा मतदारसंघातच उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. रविंद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केल्याचे बॅनर लागले आहेत. वडगाव बुद्रुक परिसरात बॅनर लावण्यात आले आहे. निकाल २ तारखेला बॅनर २७ तारखेलाच लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदारांची मतदानाकडे पाठ
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळाले. कसबा पेठ मतदारसंघात एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत. त्यापैकी ७४ हजार २१८ पुरुष आहेत. तर ६३ हजार ८०० महिला मतदारांनी मतदान केलं. या मतदारसंघात ५४.१८ टक्के पुरूष मतदार आणि ४६ टक्के महिला मतदारांनी मतदान केलं. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत एकूण ५०.६ टक्के मतदान झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.