Kasba Peth Bypoll Election : कसब्यात मतांसाठी पैसे वाटप?; मारहाण झाल्याचा आरोप करत नागरिक उतरले रस्त्यावर

दबाव आणून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Kasba Peth Bypoll Election
Kasba Peth Bypoll ElectionSaam TV
Published On

सचिन जाधव

Kasba Peth Bypoll Election : पुणे कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. अशात शनिवारी रात्री कसब्यात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. पुण्यात काल रात्री मीठगंज पोलीस चौकी समोर नागरिक रस्त्यावर उतरले होते. उमेदवारांकडून पैसे दिले जात आहेत. तसेच दबाव आणून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Latest Kasba Election News)

पैसे वाटप आणि दबाव याला विरोध करत काल रात्री महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. कसबा पेठ पोट निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप काल दंगेकर यांनी केला होता. रात्रीही मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचं निदर्शनास आल्याचं सांगत लोया नगर गंज पेठ भागातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. नागरिकांनी पोलिसांकडे या बाबत कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत हे आरोप करण्यात आलेत.

Kasba Peth Bypoll Election
Kasba Chinchwad Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदारांना मिळणार या सवलती; शासनाचे परिपत्रक जाहीर

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची लढत अधिक रंगत होत चालली आहे. काल धंगेकर यांनी असाच आरोप करत आंदोलन केलं होतं. कसब्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वांचेच या निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे.

Kasba Peth Bypoll Election
Kasba Bypoll Election : रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे; कसबा मतदारसंघात नेमकं काय घडलं?

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या जागेसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आज (२६फेब्रुवारी) मतदान होत आहे. रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com