Kasba By Election : भाजपला पाठिंबा, तरीही मनसे कार्यकर्त्यांकडून मविआ उमेदवाराचा प्रचार, पक्षातून थेट हकालपट्टी

Kasba By Election News : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याचं समोर आलं.
Kasba By Election, Raj Thackeray, MNS News Update
Kasba By Election, Raj Thackeray, MNS News UpdateSAAM TV
Published On

Kasba By Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचं रण तापलं आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत असतानाच, मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला. मात्र, तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याचं समोर आलं. यावर मनसेनं कारवाई करून संबंधित कार्यकर्त्यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. प्रचाराचा धुरळा उडाला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यातील सर्व महत्वाचे नेते या प्रचारात उतरले आहेत.

महाविकास आघाडीकडून शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे आदी नेते रिंगणात उतरले आहेत. तर, भाजप आणि शिंदे गटाकडूनही दिग्गज नेते आखाड्यात उतरले आहेत.

Kasba By Election, Raj Thackeray, MNS News Update
Maharashtra Politics : मोठी बातमी! फडणवीसांबाबत दिल्लीत कट रचला जातोय, नाना पटोले यांचा धक्कादायक दावा

दुसरीकडे, मनसेने या दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याची बाब समोर आली आहे.

यानंतर मनसेने थेट संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी मनसेने हकालपट्टी केली आहे.

Kasba By Election, Raj Thackeray, MNS News Update
Sharad Pawar : कुणी काहीही अफवा पसरवतील, दुर्लक्ष करा; कसब्यात पवार असं का म्हणाले?

या कार्यकर्त्यांवर हकालपट्टीची कारवाई

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांढांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे हे आढळून आले आहेत, तसेच गेल्या काही वर्षांपासून ते पक्षात कार्यरत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र (बाबु) वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची मनसेतून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com