Sharad Pawar : कुणी काहीही अफवा पसरवतील, दुर्लक्ष करा; कसब्यात पवार असं का म्हणाले?

Sharad Pawar : देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातोय, भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawarsaam tv
Published On

Sharad Pawar : देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातोय. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारात पवार सक्रीय झाले असून त्यांनी आज कसब्यातील गंज पेठेतील अल्पसंख्यांक मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी 'समाजात एकोपा खूप महत्त्वाचा आहे. कुणी काहीही अफवा पसरवतील, त्याकडे दुर्लक्ष करा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, पुणे शहर एकता ठेवणारं शहर आहे. येथील अल्पसंख्याक समुदाय कायम काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीसोबत राहिला आहे. देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप पवारांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Maharashtra Politics : पवारांच्या विधानानंतर फडणवीसांची गुगली! पहाटेच्या शपथविधीचा ट्विस्ट आणखी वाढवला

पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी आपण पाहिले निवडणूक आयोगाचा कसा गैरवापर होतोय. शिवसेना एकाच्या हातून काढून दुसऱ्याच्या हाती देण्याचे काम केले. शिवसेनेची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांनी सहकाऱ्यांना सागितले की माझ्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील. निवडणूक आयोगाने शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्याच्या हातात दिली नाही. निवडणूक आयोगाचा कसा गैरवापर होतो याचे उदाहरण आपण पाहिले. (Latest Political News)

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, देशात सध्या भाजपची सत्ता आहे. अगोदर अनेक पक्षाची सत्ता होती. पण मोदी यांच्या सहकाऱ्यांच्या डोक्यात सर्व देश ताब्यात हवा असे आहे. याचा सगळ्यात जास्त फटका अल्पसंख्यांक समाजाला बसत आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics : निवडणूक आयोगासह एकनाथ शिंदेंना दणका! सुप्रीम कोर्टाने बाजावली नोटीस...

पवारांनी दिल्लीच्या महापौर निवडणुकीचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, दिल्ली महापालिकेत केजरीवाल यांच्या पक्षाला बहुमत आहे. भाजपच्या विरोधामुळे महापौर पदासाठीची निवडणूक 3 वेळा रद्द करावी लागली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने आज निवडणूक झाली आणि त्यात भाजपचा पराभव झाला. यातून हेच दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते विरोधी पक्षांना काम करु देणार नाही.

कसब्यातील मतदारांना आवाहन करत पवार म्हणाले, आता आपल्या सगळ्यांना एकत्र यावे लागेल. कसबा निवडणूक खूप महत्वाची आहे. समाजात भाईचारा, एकोपा कसा ठेवायचा हे रवींद्रकडे बघून कळते. कुणी काहीही अफवा पसरवेल, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. या निवडणुकीवर लक्ष द्या, असे आव्हान पवारांनी यावेळी उपस्थितांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com