Heartbreaking : रस्त्यावरून चालणाऱ्या ९ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात मुलाचा मृत्यू

Raigad Karjat Stray Dog Attack News : रायगडच्या कर्जत तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
Heartbreaking : रस्त्यावरून चालणाऱ्या ९ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात मुलाचा मृत्यू
Raigad Karjat Stray Dog Attack NewsSaam Tv
Published On
Summary
  • कर्जत तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला

  • केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

  • हल्ल्याचा CCTV फुटेज समोर

  • परिसरात भीतीचे वातावरण

सचिन कदम, कर्जत

भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भटक्या कुत्र्यांना शहरासारख्या भागांत खाद्य पदार्थांचा हवा तसा पुरवठा होत नाही. कधी कधी वाटसरू भूतदया म्हणून त्यांना बिस्कीट सारखे अन्य पदार्थ खाऊ घालतात. हे पदार्थ त्यांची भूक वाढवत नाहीत तर, त्यांना मृत्यूच्या दाढेत खेचतात. मात्र भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत इतका सखोल विचार कोणीही करत नाही. प्राण्यांची कळ काढली की ते हल्ला करतात. हे जितकं खरं आहे, तितकचं त्यांना पुरेपूर खाद्यसाठा मिळत नसल्याने भुकेमुळे अनेकदा ते हिंस्त्रक होतात आणि एखाद्यावर हल्ला करतात. अशीच एक घटना कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी घडली या घटनेत ९ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पवार असे या मुलाचे नाव आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील उमरोळी आशाने परिसरात एक ९ वर्षांचा ऋषिकेश रस्त्याने चालत असताना समोरून धावत येणाऱ्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. क्षणभर या ऋषिकेशला समजलेच नाही की, नेमकं काय घडलं? कुत्र्यांनी हल्ला करताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. आणि कुत्र्यांच्या तावडीतून ऋषिकेशला वाचवलं. मात्र या हल्ल्यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला.

Heartbreaking : रस्त्यावरून चालणाऱ्या ९ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात मुलाचा मृत्यू
KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

ऋषिकेशवरच्या हल्ल्याचे घाव पाहता आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान ऋषिकेशचा मृत्यू झाला.

Heartbreaking : रस्त्यावरून चालणाऱ्या ९ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात मुलाचा मृत्यू
Accident News : समृद्धीवर भयंकर अपघात, ठाण्याहून नागपूरला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा जागीच मृत्यू

कुत्र्यांच्या मुलावरील हल्ल्याचा CCTV फुटेज समोर आला असून कर्जतमध्ये या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋषिकेशच्या मृत्यूने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com