Kanjurmarg Fire News कांजूरमार्गमध्ये इमारतीला भीषण आग; धुरामुळे नागरिकांचा श्वास गुदमरला

धूर झाल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती.
Kanjurmarg Fire News
Kanjurmarg Fire NewsSaam tV

Fire News : कांजूरमार्गमधून आगीची मोठी बातमी समोर आली आहे. कांजूरमार्ग पूर्व येथे कर्वे नगर परिसरात असलेल्या एमएमआरडीएच्या 15 मजली इमारतीला इलेक्ट्रिक सिटीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर तासा भरात आगीवर नियंत्रण निळवण्यात यश आले आहे. (Kanjurmarg)

आग लागल्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते. इमारतीमधील 4 महिलांना या धुराचा खूप त्रास झाला.धूर झाल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन (Fire Brigade) दलाकडून कुलिंगचे काम अद्याप सुरू आहे. या घटनमुळे काहीवेळ कांजूरमार्ग परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

Kanjurmarg Fire News
Crime News : गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला व्हिडिओ

आज सकाळी पुण्यातील चिखली येथे देखील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये भंगार दुकानातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की धूराचे लोट हवेत दूरवर पसरले होते. आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com