Kamathipura News : कामाठीपुऱ्यात टोलेजंग इमारती उभ्या राहणार; रेड लाईट एरियाचं काय होणार?

kamathipura Redevelopment Project : जगप्रसिद्ध कामाठीपुरा या रेड लाईट परिसरातील 100 वर्षाहून अधिक जुन्या झालेल्या जीर्ण इमारतींच्या समूह पुनर्विकास करण्यासाठी आता सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Kamathipura Red Light Area
Kamathipura Red Light AreaSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

जगप्रसिद्ध कामाठीपुरा या रेड लाईट परिसरातील 100 वर्षाहून अधिक जुन्या झालेल्या जीर्ण इमारतींच्या समूह पुनर्विकास करण्यासाठी आता सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहणार आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या 50 ते 180 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना तब्बल 500 चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे.

Kamathipura Red Light Area
Mhada Houses : म्हाडाच्या एका फ्लॅटची किंमत पाहून मुंबईकरांचे डोळे गरागरा फिरले; इतके महागडे घर परवडणार कसे?

कामाठीपुऱ्याचा समूह पुनविकास करण्यासाठी म्हाडा मुंबई इमारत पुनर्रचना व दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून आता विकासक नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच निविदा काढली जाणार, अशी माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.

कामाठीपुऱ्यात किती गल्ली?

कामाठीपुरा परिसरात एकूण 14 गल्ली आहेत. यातील पहिल्या 10 गल्ल्यांमध्ये निवासी आणि व्यापारी वसाहती आहेत. उर्वरित 11 ते 14 या गल्ल्यांमध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या परिसरात 943 उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे 8 हजार भाडेकरू आणि रहिवाशी वास्तव्यास आहेत.

याशिवाय 349 बिगर उपकरप्राप्त इमारती, 14 धार्मिक वास्तू, 2 शाळा आणि 4 आरक्षित भूखंड तसेच म्हाडाने बांधलेल्या 11 पुनर्रचित इमारती आहेत. शंभर वर्षाहून अधिक जून्या असलेल्या या इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. हजारो कुटुंबे अनेक वर्षापासून आपला जीव मुठीत घेऊन येथे जगत आहे.

Kamathipura Red Light Area
CSMT स्थानकामध्ये RDX ठेवल्याची धमकी; अवघ्या काही तासात कॉल करणाऱ्याला अटक

कामाठीपुऱ्याचा विकास होणार

दरम्यान, कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास व्हावा म्हणून 2014 मध्ये जमीन मालकांना म्हाडामार्फत पब्लिक नोटीस काढण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकार काळात कामाठीपुराचा पुनर्विकास व्हावा म्हणून प्रयत्नही करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर हे काम प्रलंबित पडले. या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी सल्लागार म्हणून ‘माहिमतुरा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची म्हाडा कडून नियुक्ती करण्यात आली होती. सल्लागार कंपनीकडून पुनर्विकासाचा आराखडा महाडा मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला सादरही करण्यात आला होता.

आता पुन्हा उपकर प्राप्त आणि बिगर उपकरप्राप्त अशा सर्व इमारतींचा पुनर्विकास हा समूह पुनर्विकास विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अंतर्गत करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

म्हाडा मार्फत तो विकास आराखडा मंजुरीसाठी सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे. उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी मिळतात आचारसंहिता लागण्यापूर्वीच विकासक नेमण्यासाठी म्हाडा कडून निविदा मागविल्या जाणार आहेत.

लॉटरीसाठी हजारो घरे उपलब्ध होणार

कामाठीपुऱ्याचा पुनर्विकासामुळे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला हजारो घरे उपलब्ध होऊ शकतील.ही घरे सामान्य मुंबईकरांना लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात.

जमीनमालकांना असा मिळणार मोबदला

कामाठीपुरातील काही जमीन मालकांकडून पुनर्विकासाला विरोध करण्यात आला होता. पुनर्विकास करताना जागा मालकांना विचारात घेऊन त्यांना योग्य तो मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. पुनर्विकासाच्या बदल्यात जमीन मालकांना देण्यात येणारा मोबदला देखील आता सरकारकडून निश्चित करण्यात आला आहे.

त्यामुळे जागामालकांचा पुनर्विकासाला होणारा विरोध आता मावळला असल्याने आचारसंहितापूर्वीच विकासात नेमण्याची निविदा काढली जाईल आणि लवकरच कामाठीपुराचा पुनर्विकास पुनर्विकासाला सुरुवात होईल. तसेच कित्येक वर्षापासून 80 ते 100 फुटाच्या जीर्ण घरात राहणाऱ्या नागरिकांची सुटका होऊन त्यांचे एक सुसज्ज घरात राहण्याचे त्यांचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे.

Kamathipura Red Light Area
Mhada Lottery 2024: मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्या म्हाडाची लॉटरी होणार जाहीर, कोणाला करता येईल अर्ज, किती आहेत घरांची किंमत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com