Kalyan News : AC लोकलमध्ये श्वास गुदमरून महिलेला भोवळ; Kalyan - CSMT ट्रेनच्या वातानुकूलन यंत्रणेत बिघाड

Kalyan to CSMT AC Local : एसी नसल्याने अनेक प्रवाशांचा जीव गुदमरतोय. यातच मंगळवारी एका महिलेला भोवळ आली. चक्कर येऊन महिला खाली कोसळली. उपस्थितांनी तात्काळ तिच्यावर प्रथमउपचार केले.
Kalyan to CSMT AC Local
Kalyan NewsSaam TV
Published On

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामध्ये अनेक प्रवासी थोडा सुखाचा प्रवास असावा यासाठी महागड्या एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. मात्र या एसी लोकलमध्ये देखील प्रवाशांना गर्दी, घामाच्या धारा यांचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. कारण सोमवारपासून मुंबई कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झालाय.

Kalyan to CSMT AC Local
Vande Bharat Train: भारतीय रेल्वेचा तगडा प्लॅन; वंदे भारत स्लीपर-बुलेट ट्रेन, चिनाब ब्रिजसह बरंच काही

एसी लोकलमध्ये महिलेला भोवळ

एसी लोकलमध्ये दरवाजे बंद असल्याने बाहेरून कोणतीही हवा आतमध्ये येत नाही. त्यामुळे एसी नसल्याने अनेक प्रवाशांचा जीव गुदमरतोय. यातच मंगळवारी एका महिलेला भोवळ आली. चक्कर येऊन महिला खाली कोसळली. उपस्थितांनी तात्काळ तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर महिला शुद्धीत आली.

हा सर्व प्रकार सकाळी कल्याण येथून सीएसएमटीसाठी ८.५४ वाजता - सुटणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. या ट्रेनमधील ७०५२ सी डब्ब्यातील वातानुकूलन यंत्रणा बिघडली आहे. ही वातानुकूलन यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी यासाठी प्रवाशांनी समाजमाध्यमांद्वारे रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र,प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही दखल घेत नाहीये, असं चित्र दिसतंय.

कल्याण -सीएसएमटी एसी ८.५४ वाजता सुटणारी लोकल ट्रेन अनेक चाकरमानी पकडतात. सकाळच्यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. आता या कोचमध्ये एसी नसल्याने चढलेल्या सर्व प्रशांचा जीव गुदमरू लागला होता. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. असाच त्रास एका महिलेला जास्त जाणवू लागला आणि ती चक्कर येऊन खाली पडली.

एसी लोकल ट्रेनची यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, हे रोज पाहणे रेल्वेचे काम आहे. जर काही कारणास्तव यंत्रणा बंद असेल तर 'एसी' उपनगरी रेल्वेगाडीचे दरवाजे उघडे ठेऊन ती चालवावी. दरवाजे बंद असल्यास प्रवाशांनी गुदमरत प्रवास करायचा का? असा संतप्त सवाल येथील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.

Kalyan to CSMT AC Local
Rain In AC Local Train: भर उन्हात एसी लोकलमध्ये पाऊस आला तरी कुठून? माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केला VIDEO,एकदा पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com