डोंबिवली : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील १६ लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रवास करत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात असून भाजपाने येथे देखील मोर्चेबांधणी आखल्याने भाजपा येथे आपला उमेदवार उभा करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Kalyan News Today)
कल्याण आणि पालघर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्र्यांचा लवकरच दौरा होणार असून भाजपाने त्यापद्धतीने आखणी देखील केली आहे. कल्याण लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे ११ सप्टेंबरपासून तीन दिवस दौरा करणार आहेत. याबाबतची माहिती भाजप आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटी प्रकरणाबाबत निर्णय राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाचा आहे. तसेच येत्या दोन वर्षात देशाच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. या अंतर्गत ते नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षबांधणीचे काम करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. दरम्यान याच तयारी करता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा क्षेत्रात येणार असून त्यांचा तीन दिवसीय दौरा आहे. (Kalyan Palghar Loksabha BJP News)
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून ही तयारी सुरू असल्याचं बोललं जातंय. या दौऱ्याबाबतची माहिती देण्यासाठी भाजप कडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप आमदार संजय केळकर यांनी दौऱ्याबाबतची माहिती दिली. यावेळी संजय केळकर म्हणाले की, या मतदारसंघातून कमळ निवडणूक गेले पाहिजे असे भारतीय जनता पार्टीचे नियोजन आहे.
या लोकसभा शंभर टक्के तयार झाल्या पाहिजेत पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी असे काम आमच्याकडून सुरू झाले आहे,असेही केळकर यांनी सांगितले.तर कल्याण लोकसभेवर भाजप दावा करणार का प्रश्न केल्यावर केळकर यांनी सांगितले की राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडुन गेले पाहिजे दिल्लीला, हे प्लँनिग सहा महिन्यांपूर्वी झाले आहे, त्या दृष्टीने काम चालू झालेलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.